• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे तर अध्यक्षपदी माधव बावगे यांची एकमताने निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 2, 2025
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

शहादा, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत शनिवारी दि. ३१ मे रोजी दुपारी करण्यात आली असून अध्यक्षपदी लातूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे यांची तर राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यासह ५ प्रधान सचिव आणि ७ राज्य सरचिटणीस आता पुढील तीन वर्षात प्रभावी नेतृत्व करणार आहेत. राज्यभरातून या बैठकीला ४६० कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे.

लोणखेडा (ता.शहादा) येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी निवड सहमती समितीचे सदस्य माधव बावगे, सुशिला मुंडे, संजय शेंडे यांनी २०२५ ते २०२८ पर्यंतच्या त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणीची निवड जाहिर केली. ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे (लातूर) यांची अध्यक्षपदी व संजय बनसोडे (इस्लामपूर जि.सांगली) राज्य कार्याध्यक्ष पदावर निवड जाहिर करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष पदांवर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक), डॉ.प्रदिप पाटकर (पनवेल), डॉ.अशोक बेलखोले (किनवट ता.नांदेड), संतोष आंबेकर (बुलढाणा), संजय शेंडे (नागपूर), डॉ. रश्मी बोरीकर (संभाजीनगर), शामराव पाटील (इस्लामपूर) यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्य प्रधान सचिव म्हणून डॉ.ठकसेन गोराणे (नाशिक), विनायक सावळे (शहादा जि.नंदुरबार), गजेंद्र सुरकार (वर्धा), रुक्साना मुल्ला (लातूर), विजय परब (मुंबई) यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकारी समितीत सरचिटणीस म्हणून आरती नाईक (पनवेल), सुरेश बोरसे (शिरपूर जि.धुळे), कृष्णात कोरे (कोल्हापूर), सुधाकर काशीद (सोलापूर), विलास निंबोरकर (गडचिरोली), शहाजी भोसले (छ.संभाजीनगर), उत्तरेश्वर बिराजदार (लातूर) यांचा समावेश आहे.

उर्वरित राज्य कार्यकारीणीत विविध विभागांच्या कार्यवाह व सहकार्यवाह यांची पुढीलप्रमाणे निवड झाली : महिला सहभाग : कार्यवाह अमरावतीच्या गायत्री आडे, सहकार्यवाह मुंबईचे रुपेश शोभा, युवा सहभाग : कार्यवाह पनवेलचे प्रियंका खेडेकर, सहकार्यवाह कोल्हापूरचा हरी आवळे, जोडीदाराची विवेकी निवड : कार्यवाह कोल्हापूरचे रेश्मा खाडे, सहकार्यवाह नागपूर येथील कविता मते, जातपंचायत मूठमाती अभियान : कार्यवाह नाशिकचे कृष्णा चांदगुडे, मिश्र विवाह, सत्यशोधकी विवाह : लातूर येथील रणजित आचार्य, प्रशिक्षण व्यवस्थापन : कार्यवाह नंदुरबार येथील किर्तीवर्धन तायडे, सहकार्यवाह वर्धा येथील डॉ. माधुरी झाडे, वि.जा. प्रकाशन, वितरण : कार्यवाह ठाणे येथील प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे, मानसिक आरोग्य व्यवस्थापन : कार्यवाह पनवेल येथील डॉ. अनिल डोंगरे, जळगावचे मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदिप जोशी, सहकार्यवाह बीड येथील अतुल बडवे, जळगावचे विश्वजित चौधरी, विज्ञान बोध वाहिनी : कार्यवाह सांगली जिल्ह्यातील भास्कर सदाकळे, सहकार्यवाह लातूर येथील बाबा हलकुडे, विवेक वाहिनी : कार्यवाह बीड येथील प्राचार्या डॉ. सविता शेटे, सहकार्यवाह परभणी येथील प्राचार्य डॉ. विठ्ठलराव घुले, कागल जि. कोल्हापूर येथील प्रा.डॉ.संतोष जेठीथोर यांचा समावेश आहे.

तर सांस्कृतिक अभिव्यक्ती : कार्यवाह पालघर जिल्ह्यातील अनिल शोभना वसंत, सहकार्यवाह रत्नागिरी येथील सचिन गोवळकर, सोशल मिडिया : कार्यवाह धुळे येथील मनोज बोरसे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समन्वय : कार्यवाह नाशिक येथील प्रा.डॉ.सुदेश घोडेराव, निधी व्यवस्थापन : कार्यवाह शिंदखेडाचे प्रा. परेश शाह, सहकार्यवाह ठाण्याचे सुधीर निंबाळकर, कायदेविषयक व्यवस्थापन : कार्यवाह पुणे येथील अॅड. मनिषा महाजन, सहकार्यवाह ठाणे येथील अॅड. तृप्ती पाटील, सोलापूरचे अॅड. गोविंद पाटील, व्यसनविरोधी प्रबोधन आणि संघर्ष : कार्यवाह वर्धा येथील सारिका डेहनकर, सहकार्यवाह अंबाजोगाईचे सुधाकर तट, संविधान जागर विभाग : कार्यवाह पुण्याचे अॅड. परिक्रमा खोत, सर्वेक्षण आणि संशोधन विभाग : कार्यवाह नांदेडचे प्रा. डॉ. बालाजी कोंपलवार, सहकार्यवाह अमरावतीचे प्रा. डॉ. हरीश पेटकर, दस्तऐवज संकलन : कार्यवाह नवी मुंबई येथील अशोक निकम, विविध उपक्रम विभागांमध्ये लातूरचे कार्यवाह म्हणून अनिल दरेकर, बुवाबाजी संघर्ष विभाग मध्ये अहिल्यानगरच्या अॅड. रंजना गवांदे, सहकार्यवाह म्हणून भंडारा येथील विष्णुदास लोणारे, वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प कार्यवाह म्हणून जळगावचे प्रा. दिगंबर कट्यारे, सहकार्य म्हणून वर्धा येथील प्रकाश कांबळे, चंद्रपूर येथील पी.एम. जाधव, शहादा येथील रवींद्र पाटील, अंनिप संपादक मंडळात मुख्य संपादक म्हणून सांगली येथील डॉ.नितीन शिंदे, कार्यकारी संपादक पुण्याचे उत्तम जोगदंड सदस्य नांदेडचे डॉ.बाळू दुगडूमवार, नाशिकचे प्रल्हाद मिस्त्री, सांगली जिल्ह्यातील श्यामसुंदर मिरजकर, नाशिकचे राजेंद्र फेगडे, नंदुरबारचा हंसराज महाले, सांगलीचे अजय भालकर यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.


Next Post
मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाज प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न

मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाज प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group