• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 15, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त शहरांमध्ये रविवारी दि. १४ रोजी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये वाहन दुरुस्तीची विविध तंत्रे आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार आलेले नवीन कौशल्य याविषयी खान्देशातील दुचाकी गॅरेज चालकांनी विविध कंपन्यांच्या तंत्रज्ञाकडून प्रशिक्षण घेतले. दुचाकी दुरुस्तीची सेवा केवळ रोजगार नव्हे तर देशसेवा आहे असे त्यांनी सांगितले.

खान्देश टू व्हीलर टेक्निशन असोसिएशनने नुकतीच १० वर्षे पूर्ण केली. अकराव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे छत्रपती संभाजीनगर येथील संस्थापक अध्यक्ष सय्यद चांद, नाशिकचे अध्यक्ष रवींद्र लोंढे, बुलढाणाचे अध्यक्ष किशोर पाटील, मलकापूरचे अध्यक्ष सोनाजी खर्चे, देऊळगाव गुजरी येथील शेख अन्सार, विविध कंपन्यांचे तंत्रज्ञ दीपेश यादव, वैभव सिंघाळे, लोकेश कोल्हे, आदित्य पगारिया, खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनचे अध्यक्ष अश्फाक मिर्झा, उपाध्यक्ष शेख मुश्ताक, सचिव अमीन शेख उपस्थित होते.

सुरुवातीला प्रस्तावनेमधून अशपाक मिर्झा यांनी कार्यशाळा घेण्यामागील उद्देश स्पष्ट करीत गॅरेज चालकांसाठी नवीन उपक्रम घेण्यात येतील असे सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सय्यद चांद यांनी सांगितले की, प्रत्येक तंत्रज्ञाच्या मनात यंत्राबद्दल प्रेम, हातात कौशल्य आणि शिकण्याची जिद्द कायम असली पाहिजे त्यामुळे तुम्हाला उज्वल भविष्य मिळू शकेल. तर रवींद्र लोंढे यांनी सांगितले की, आपले कौशल्य अधिक विकसित करून देशाच्या विकासामध्ये आपले महत्त्वाचे योगदान दिले पाहिजे. त्यासाठी कायम अपडेट राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन संदीप सूर्यवंशी यांनी केले. आभार शरीफ बाबा यांनी मानले. कार्यशाळेमध्ये विविध कंपन्यांचे स्पेअर पार्ट्स आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाहनांशी निगडित बाबी याबाबत प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचेही उद्घाटन मान्यवरांनी सकाळी केले. दिवसभरात खान्देशातील ४०० दुचाकी गॅरेज चालकांनी भेट देऊन कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

दुचाकी तंत्रज्ञाचे कौशल्य हे अपडेट राहिले पाहिजे. सतत शिकत राहिले तर तुम्ही ग्राहकांना महत्त्वाची सेवा प्रदान करू शकतात. शरीर बिघडले की डॉक्टर ते दुरुस्त करतात. त्याच पद्धतीने वाहन बिघडले की ते दुरुस्त करणारे डॉक्टर आपणच असतो याची जाणीव कायम ठेवा, असेही या मार्गदर्शकांनी दुचाकी तंत्रज्ञांना सांगितले.

कार्यशाळेसाठी असोसिएशनचे खजिनदार शरीफ पिंजारी, आबिद बागवान, दस्तगीर पिंजारी, सय्यद अन्सार, अनिल पितळे, अशोक बन्सी, शरीफ मणियार, शेख कलीम, फिरोज मणियार, शेख निसार, मकसूद शेख आदी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


 

Tags: #jalgaon_city
Next Post
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा 'बालगंधर्व' महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add