• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 12, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन

जळगाव, (प्रतिनिधी) : परीट-धोबी समाजाला पुन्हा अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करून पूर्ववत आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परीट-धोबी आरक्षण हक्क परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे राज्यस्तरीय आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


​​राज्यात १९६० पर्यंत परीट-धोबी समाज SC प्रवर्गात होता, मात्र राज्यघटनेच्या कलम ३४१ चा भंग करून तो इतर मागास प्रवर्गात (OBC) समाविष्ट करण्यात आला. ​२००२ मध्ये शासनाने नेमलेल्या डॉ. भांडे समितीने धोबी समाजाला पूर्ववत SC आरक्षण लागू करण्याची स्पष्ट शिफारस केली आहे. ​२००६ च्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चावेळी तत्कालीन विरोधी पक्ष आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांकडे धोबी समाजाला SC मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस करण्याची मागणी केली होती. ​मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या हाती सत्ता असूनही समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने हा असंतोष व्यक्त केला जात आहे.

​’लाव रे तो व्हिडिओ’ मोहीम
​या आंदोलनात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००६ साली SC आरक्षणाची शिफारस करणारे केलेले संपूर्ण भाषण ‘लाव रे तो व्हिडीओ…’ ही टॅगलाईन वापरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्याचे आवाहन युवा पिढीला करण्यात आले आहे. मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींपर्यंत हा मुद्दा पोहोचवून सनदशीर मार्गाने न्याय मिळवण्याचा हेतू आहे.

पत्रकार परिषदेत संत गाडगेबाबा युवा फौंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश ठाकरे, राज्य सचिव शंकर निंबाळकर, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष शाम वाघ, डेबूजी फोर्सचे जिल्हाध्यक्ष सागर सपके, ज्येष्ठ नेते दिनकर सोनवणे, लॉड्री असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण राऊत युवा प्रदेश कार्याध्यक्ष दीपक बाविस्कर, प्रसिद्धी प्रमुख राकेश वाघ, डेबूजी युथचे जिल्हाध्यक्ष गणेश सपके आदी उपस्थित होते.
​


 

Next Post
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

ताज्या बातम्या

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
क्रिडा

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 24, 2026
शेतीच्या वादातून कन्नडच्या व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; गोणीत मृतदेह भरून बहुळा नदीत फेकला
Uncategorized

शेतीच्या वादातून कन्नडच्या व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; गोणीत मृतदेह भरून बहुळा नदीत फेकला

November 24, 2026
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी
जळगाव जिल्हा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी

November 24, 2026
होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन

November 24, 2026
बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंदिस्त कामासाठी अडीच कोटी मंजूर; वर्षभरात दिवस-रात्र नाट्यप्रयोग रंगणार
जळगाव जिल्हा

बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंदिस्त कामासाठी अडीच कोटी मंजूर; वर्षभरात दिवस-रात्र नाट्यप्रयोग रंगणार

November 24, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

November 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add