• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनैतिक संबंधाच्या संशयावरून चोपड्यात दगडाने ठेचून खून ; एकाला अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 26, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अनैतिक संबंधाच्या संशयावरून चोपड्यात दगडाने ठेचून खून ; एकाला अटक

चोपडा, (प्रतिनिधी) : कचरा वेचणाऱ्या तरुणाने त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचे संशयावरून त्याला लाकडी काठीने मारहाण केली. तसेच डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवार दिनांक २४ मे रोजी पहाटे उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे.

शहरातील पं.स. सभापती निवास असणाऱ्या स्थळी एका अज्ञात इसमाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी काही तासांतच आरोपीस अटक केली आहे. चोपडा शहरात कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणारे दोन पुरुष व एक स्त्री हे सोबत कचरा गोळा करतात. यापैकी मृत व्यक्ती आणि सोबत असणारी ३५ वर्षीय महिला यांचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात ठेवत राजेश काशीनाथ बारेला याने मृताच्या डोक्यात दगड मारून खून केला.

हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले असून मयताची ओळख मात्र पटलेली नाही. तसेच जानू बारेला हिलादेखील मारहाण करून जखमी केल्याची घटना २५ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली होती. पंचायत समितीसमोर असणाऱ्या सभापती निवासाच्या प्रांगणात एका अज्ञाताचा मृतदेह पडल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी तपासकामी चार पथके तयार करून धरणगाव, पारोळा आदी ठिकाणी पाठवली. मात्र, चार तासांत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी राजेश काशीराम बारेला (३३, चाचऱ्या, ता. सेंधवा) या आरोपीस गोरगावले रोडवरून ताब्यात घेत त्याला अटक केली आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाला असून, मृताची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags: Crime
Next Post
मध्यरात्री जळगावात काळ बनून धावले अज्ञात वाहन ; दुचाकीस्वाराचा अपघातात अंत

मध्यरात्री जळगावात काळ बनून धावले अज्ञात वाहन ; दुचाकीस्वाराचा अपघातात अंत

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add