• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

२५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करीत मालेगावातील संशयिताला अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 2, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
२५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करीत मालेगावातील संशयिताला अटक

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका वाहनातून तब्बल २५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करीत मालेगावातील संशयिताला अटक केली आहे. संशयित आरोपीकडील चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे.

शेख नदीम शेख बशीर (वय ४०, गुलवानी खालदा, गल्ली नं. ३. मालेगाव, जि. नाशिक) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. चाळीसगाव शहर पोलीस बुधवारी पहाटेच्या सुमारास गस्तीवर असताना मालेगाव रोडवरील धुळे ते छत्रपती संभाजीनगर बायपास चौफुली येथे वाहनांची तपासणी करत होते. गस्तीवर पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर (एम.एच.१२ के. एन. २३०५) ची तपासणी केली असता डिक्कीमध्ये निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्यात गांजासारखा वास असलेला पदार्थ आढळला. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आल्यानंतर वाहनात गांजा असत्याचे स्पष्ट झाले. या गांजाचे एकूण वजन ४२ किलो ५८३ ग्रॅम असून त्याचे अंदाजित बाजारमूल्य २४ लाख ६९ हजार १५० रुपये आहे. गांजा वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली. संशयित आरोपीविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षकर कविता नेरकर, उपअधीक्षक राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, योगेश माळी, कैलास पाटील, अरुण बाविस्कर, पोलीस हवालदार राहुल सोनवणे, विनोद पाटील, योगेश बेलदार, अजय पाटील, पोलीस नाईक भूषण पाटील, राकेश पाटील, नितीन आगवणे, महेंद्र पाटील, नरेंद्र चौधरी, अमोल भोसले, नीलेश पाटील, नाना बच्चे, आशुतोष सोनवणे, विजू पाटील, राकेश महाजन, समाधान पाटील, दीपक चौधरी, पवन पाटील, महिला पोलीस शिपाई सबा शेख आदीच्या पथकाने केली.

 


 

Tags: chalisgaonCrime
Next Post
तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या.. – अशोक जैन

तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या.. - अशोक जैन

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add