• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 16, 2025
in क्रिडा
0
एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी राज्य पॅनलमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मे २०२५ मध्ये होणाऱ्या स्कोअरर्सच्या परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय पॅनलमध्ये स्थान मिळणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांना २५ एप्रिल २०२५ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीची लिंक व अधिक माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वेबसाईटवर व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेचा अचूक दिनांक, स्वरूप आणि पुढील प्रक्रियेची माहिती उमेदवारांना देण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील होतकरू स्कोअरर्स यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. सहव्यस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केले आहे. त्यासाठी अरविंद देशपांडे (९४०४९५५२०५) व मोहम्मद फजल (७८७५४६६३०३२) यांच्याशी संपर्क साधावा.

या उपक्रमामागील उद्देश राज्यातील प्रत्येक भागातील, ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रतिभावान स्कोअरर्सना व्यासपीठ उपलब्ध करून देणे असा आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार व सर्व अपेक्स कौन्सिल मेंबर्स यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, “ज्यांना क्रिकेट या खेळाविषयी आवड आहे व बारकावे लक्षात ठेवण्याची क्षमता आहे, त्यांच्यासाठी क्रिकेट स्कोअरर म्हणून करिअर करणे हे अत्यंत उपयुक्त आणि समाधानकारक ठरू शकते. याद्वारे विविध स्तरांवर क्रिकेटशी जोडले जाऊन काम करण्याची संधी स्कोअरर्सना मिळू शकते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील प्रतिभावान युवकांना स्वतःची क्षमता दाखविण्याचे व्यासपीठ मिळावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” एमसीए तर्फे या उपक्रमाचे समन्वयक कुमार ठक्कर हे असतील.

ज्यांनी मागील वर्षी परीक्षा दिली नव्हती, फक्त त्या नवीन अर्जदारांसाठीच ही लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ज्यांनी मागील वर्षी ही परीक्षा दिली आहे, त्यांची केवळ प्रायोगिक परीक्षा घेतली जाईल. प्रायोगिक परीक्षेची वेळ आणि स्थळ लवकरच कळविण्यात येईल. असे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे सचिव कमलेश पिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


 

Tags: #sports
Next Post
केळी व मका पिकांचे जिल्ह्यात मोठे नुकसान ; पंचनाम्याचे निर्देश

केळी व मका पिकांचे जिल्ह्यात मोठे नुकसान ; पंचनाम्याचे निर्देश

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add