• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाविकांच्या अंतकरणात भक्तीचा जिव्हाळा महत्त्वाचा.. – किशोर महाराज

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 29, 2021
in धार्मिक
0
भाविकांच्या अंतकरणात भक्तीचा जिव्हाळा महत्त्वाचा.. – किशोर महाराज

जळगाव, दि. 28 – भगवंताच्या स्वरूपापर्यंत पोहोचणे हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो. परमात्म्याचे पद मिळणे कठीण असते. साधकालाच फक्त हे पद मिळते. भक्तीच्या रूपाने साधना करावी लागते. भक्तीचा भाविकांच्या अंतकरणात जिव्हाळा असायला पाहिजे. तेव्हा त्याला अध्यात्मिक ज्ञान मिळते, असे मार्गदर्शन तळवेल येथील किशोर महाराज यांनी केले.

मेहरुण भागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन २५ नोव्हेंबर २ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. सप्ताहाचे २१ वे वर्षे आहे. शनिवारी रात्री तळवेल येथील किशोर महाराज यांनी प्रबोधन केले.

किशोर महाराज पुढे म्हणाले की, भगवंतांच्या सान्निध्यात राहिले तर मनःशांती लाभते. श्रीकृष्ण आणि गोपिकांची भक्ती याविषयी सांगून त्यांनी देव भावाचा भुकेला असतो हे स्पष्ट केले. आपण निस्वार्थ भावनेने भक्ती करीत गेलो तर देवाची कृपा आपल्यावर होतेच. श्रद्धा असणे त्यासाठी महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. प्रसंगी संतांचे विविध अभंग आणि दोहे सांगून त्यांनी प्रबोधन केले. यावेळी आयोजक नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह मेहरुण परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
स्नेहल माळीला राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक

स्नेहल माळीला राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add