• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

क्षुल्लक कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, एकाला अटक

एरंडोल येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 7, 2025
in गुन्हे
0
क्षुल्लक कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, एकाला अटक

एरंडोल, (प्रतिनिधी) : नातीची सायकल का फेकली याचा जाब विचारल्याच्या किरकोळ कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना दि.२ एप्रिल रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. संशयिताने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याचेवर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

गांधीपुरा भागातील रहिवासी माजी नगरसेवक सुभाष सोनू मराठे यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या नातींच्या सायकली राहत्या घराच्या ओट्यावर लावल्या होत्या. त्याचवेळी गल्लीत राहणारे करण उर्फ विजय ज्ञानेश्वर केदार, सनी संदानशिव, लकी संदानशिव या तिघांमध्ये वाद सुरु झाला. तिघांमध्ये भांडण सुरु असतांना त्यांनी सुभाष मराठे यांच्या ओट्यावर लावलेल्या सायकली फेकून दिल्या. सायकली फेकल्यानंतर देखील सुभाष मराठे तिघाही तरुणांना काहीही बोलले नाहीत.

बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सुभाष मराठे व त्यांचा मुलगा अतुल मराठे यांनी काल तुम्ही सायकली का फेकल्या असे विचारले. याचा राग आल्याने तिघाही संशयितांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करून वाद घालत असतांनाच संशयित लकी संदानशिव याने त्याचेजवळ असलेल्या धारदार शस्त्राने अतुल मराठे याच्या पाठीवर आणि हातावर दोन वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये अतुल मराठे गंभीर जखमी झाला. सुभाष मराठे यांनी आरडाओरड केल्यामुळे गल्लीतील उल्हास लोहार, हर्शल पाटील, अंकुश मराठे, हर्शल वंजारी घटनास्थळी आले आणि त्यांनी गंभीर जखमी झालेल्या अतुल मराठे यास पद्मालय हॉस्पिटल येथे नेले.

पद्मालय हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास जळगाव येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत सुभाष मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघाही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत. हल्ल्यात जखमी झालेले अतुल मराठे शिवसेनेच्या गांधीपुरा विभागाचे शहरप्रमुख आहेत. दरम्यान संशयित आरोपी करण उर्फ विजय ज्ञानेश्वर केदार यास न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags: Crime
Next Post
पंधरा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार ; बालिकेने दिला बाळाला जन्म

पंधरा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार ; बालिकेने दिला बाळाला जन्म

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add