• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पंधरा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार ; बालिकेने दिला बाळाला जन्म

जळगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 7, 2025
in गुन्हे
0
पंधरा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार ; बालिकेने दिला बाळाला जन्म

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहून तिने एका बाळाला जन्म दिला. या मुलीला शेतालगत असलेल्या नाल्याजवळ बोलवून तिच्यावर संशयित आरोपीने अत्याचार केला असून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी अत्याचार करणारा गणेश अशोक बोरसे याला अटक करण्यात आले आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला नात्यातीलच गणेश बोरसे याने गावठाण परिसरातील शेतालगतच्या नाल्याजवळ बोलविले होते. तेथे त्याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर याविषयी कोणाला काहीही न सांगण्याची धमकीदेखील त्याने या मुलीला दिली.

तो वेळोवेळी मुलीला नाल्याजवळ बोलवून तिच्यावर अत्याचार करीत राहिला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिची प्रसूती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गणेश बोरसे याच्याविरुद्ध बलात्कार, पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Tags: Crime
Next Post
पाय घसरून विहिरीत पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यात घटना

पाय घसरून विहिरीत पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यात घटना

ताज्या बातम्या

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

August 30, 2026
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !
जळगाव जिल्हा

गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !

August 30, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

कडमळू येथे घरफोडी; १ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
जळगाव जिल्हा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add