• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे.. – सीईओ मीनल करनवाल

पाणी फाउंडेशनतर्फे शेतकरी गटांचा गौरव

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 5, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे.. – सीईओ मीनल करनवाल

जळगाव, (प्रतिनिधी) : अत्याधिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची पोत खराब होतेच, शिवाय याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावरही होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात शुक्रवार दि. ४ रोजी आयोजित पाणी फाऊंडेशनच्या फार्मर कप बक्षीस वितरण कार्यक्रमात करनवाल बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस. लोखंडे तसेच गटशेती करणाऱ्या महिलांचे समूह उपस्थित होते. करनवाल यांनी सांगितले की, “शेती ही निसर्गावर आधारित असून त्यात अनेक धोके असतात. तरीही शेतकऱ्यांनी नवकल्पना स्वीकारून शेतीत नवे प्रयोग करावेत. आज पाणी ही संपणारी गोष्ट आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर, साठवणूक आणि जमिनीत रुजवणूक आवश्यक आहे.”

जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘मिशन संजीवनी’ या उपक्रमांतर्गत ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ सारखे उपक्रम राबवले जाणार असून, त्यात पुढाकार घेणाऱ्या शेतकरी गटांना वॉटर कपच्या धर्तीवर बक्षीस देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमात धरती माता शेतकरी गट, रोटवद शेतकरी गट, शंभू महिला शेतकरी गट, गायत्री महिला शेतकरी गट यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

Next Post
गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या एकास अटक ; एलसीबीची कारवाई

गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या एकास अटक ; एलसीबीची कारवाई

ताज्या बातम्या

श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन

September 3, 2025
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद
खान्देश

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद

September 2, 2025
अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2025
अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा

September 1, 2025
२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
खान्देश

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

August 30, 2025
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
कृषी

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group