• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोडावून फोडून साडेआठ लाखांचा पापड मसाला चोरणाऱ्यांना अटक

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 2, 2025
in गुन्हे
0
गोडावून फोडून साडेआठ लाखांचा पापड मसाला चोरणाऱ्यांना अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : बंद असलेल्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८ लाख ३५ हजार १०२ रुपये किमतीचा पापड मसाला चोरून नेल्याची घटना दि. २४ ते २६ मार्चदरम्यान औद्योगिक वसाहत परिसरातील एम सेक्टरमध्ये घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्याने तपास करून फिर्यादीच्या चालकासह चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अतुल विश्वनाथ मुळे यांचे मालकीची एमआयडीसी येथील एम सेक्टर २११/२ येथे श्री प्रभु डिस्ट्रीब्युटर्स नावाची कंपनी आहे. ही कंपनी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये रामबंधु मसाले कंपनीची अधिकृत डीलरशीप सांभाळते. दि. २५ मार्च २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडाऊनचे शटर तोडून सुमारे ०८ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या ७१ गोण्या चोरून नेल्या.(केसीएन)दि. २७ मार्च २०२५ रोजी अतुल मुळे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांनी त्वरित तपास पथक स्थापन केले. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, तसेच पोलीस कर्मचारी राहुल रगडे, गणेश ठाकरे, विशाल कोळी, सिद्धेश्वर डापकर, रतन गीते यांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधून इको कारचा वापर करत गोडाऊन फोडल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने वापरलेले वाहन आणि त्यातील व्यक्तींची ओळख पटवण्यात आली. तपासादरम्यान, फिर्यादी अतुल मुळे यांचे मागील १५ वर्षांपासून चालक असलेले अनिल रमेश पाटील (रा. मिल कॉलनी, खडका, भुसावळ) यांनीच त्यांच्या साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. अनिल पाटीलला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यावर त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली.

त्यानुसार संशयित बाबुराव त्र्यंबक सुरवाडे (रा. पळासखेडा, ता. जामनेर), शिवा सुरेश पाटील (रा. भवानी नगर, खडका, भुसावळ), राहुल बाविस्कर (रा. खडका, ता. भुसावळ) यांना पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली. (केसीएन)त्यांना ०२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. चोरीस गेलेल्या सर्व ७१ गोण्या ०८ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या आणि चोरीसाठी वापरलेली दोन इको वाहने जप्त करण्यात आली आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे संपूर्ण मुद्देमाल हस्तगत झाल्याने फिर्यादी अतुल मुळे यांनी पोलीस दलाचे आभार मानले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस कर्मचारी योगेश घुगे करीत आहेत.


 

Next Post
तरुणाच्या डोक्यात वीट मारुन केले गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

तरुणाच्या डोक्यात वीट मारुन केले गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add