• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चारित्र्याच्या संशयावरून पतीने कुऱ्हाडीने हल्ला करत पत्नीला केले ठार

महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 28, 2025
in गुन्हे
0
चारित्र्याच्या संशयावरून पतीने कुऱ्हाडीने हल्ला करत पत्नीला केले ठार

धरणगाव, (प्रतिनिधी) : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी व मुलावर कुऱ्हाडीने हल्ला करत पत्नीला ठार केल्याची धक्कादायक घटना तालुक्यात हनुमंतखेडा येथे घडली असून यात त्या व्यक्तीचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंतखेडा येथील रहिवासी सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे हा पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर नेहमी चारित्र्याबाबत संशय घेऊन मारहाण करत असे. शुक्रवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास सोमनाथने पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात तिचा मृत्यू झाला. याप्रसंगी त्याने दहा वर्षाचा मुलगा सिध्दू सोमनाथ सोनवणे याच्यावरही वार केले असून तो देखील गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मयत शीतल उर्फ आरती सोमनाथ सोनवणे हिचा भाऊ भाऊसाहेब भावलाल पवार (रा. हनुमंतखेडा. ता. धरणगाव ) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश वाघ, उपनिरिक्षक संतोष पवार व हवालदार राजू पाटील हे करत आहेत.

Next Post
जिल्हा परिषदेचा दुसरा, चौथा मंगळवार नागरिकांसाठी ; तालुकास्तरावर ऐकण्यात येतील तक्रारी !

जिल्हा परिषदेचा दुसरा, चौथा मंगळवार नागरिकांसाठी ; तालुकास्तरावर ऐकण्यात येतील तक्रारी !

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add