• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा परिषदेचा दुसरा, चौथा मंगळवार नागरिकांसाठी ; तालुकास्तरावर ऐकण्यात येतील तक्रारी !

सीईओ मीनल करनवाल यांच्या सूचना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
जिल्हा परिषदेचा दुसरा, चौथा मंगळवार नागरिकांसाठी ; तालुकास्तरावर ऐकण्यात येतील तक्रारी !

जळगाव, (प्रतिनिधी) : वर्षानुवर्ष साचलेल्या त्याच त्या तक्रारी, जिल्हा परिषदेशी संबंधित असलेल्या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विविध शाखा कार्यालयांना नागरिक व कर्मचारी यांना वारंवार माराव्या लागणाऱ्या फेऱ्या यापासून आता संबंधित कार्यालय व नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून दर महिन्यातून दोन वेळा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत तालुका स्तरावर तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे.

यातून सर्व प्रकारच्या तक्रारीचे जागच्या जागी निराकरण करण्यात येणार आहे. या अभिनव योजनेमुळे एक प्रकारे प्रशासन आपल्या दारी याचा प्रत्यय नागरिकांना येणार आहे. शासकीय कार्यालय म्हटले की वर्षानुवर्षाच्या प्रलंबित तक्रारी विविध प्रकारच्या निर्णयाच्या फायलींसाठी माराव्या लागणाऱ्या चकरा त्यातून होणारा मनस्ताप असा अनुभव कित्येकदा सामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांना येत असतो. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नव्यानेच हजर झालेल्या मिनल करनवाल यांनी हजर झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातच संबंधित विभागांचा आढावा घेऊन वर्षानुवर्षाच्या साचलेल्या तक्रारींचे निराकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच त्यांनी तालुकास्तरावर महिन्यातून दोन वेळा तक्रार निवारण दिन घेण्याचा व प्राप्त तक्रारींचा जागच्या जागी निपटारा करण्याचा निश्चय केला आहे.

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख तालुकास्तरावर जाणार असून तालुकास्तरावर तक्रार निवारण दिन घेणार आहेत. या तक्रार निवारण दिनात प्राप्त होणाऱ्या विविध प्रकारच्या प्रशासकीय तक्रारींवर साधक बाधक चर्चा करून त्या तक्रारींचे जागच्या जागी निराकरण करण्यात येणार आहे. यामुळे अनेक दिवस साचणाऱ्या तक्रारी, विविध प्रकारच्या समस्या या अत्यंत जलद पद्धतीने वेळच्यावेळी सोडवल्या जाणार आहेत. अत्यंत अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना विविध तक्रारींपासून तसेच वारंवार शासकीय कार्यालयात माराव्या लागणाऱ्या चकरा पासून मुक्ती मिळणार आहे.

 


 

Next Post
लाच स्वरुपात मागितले चक्क हरभरे ! ; लाचखोर भू-करमापक गजाआड

लाच स्वरुपात मागितले चक्क हरभरे ! ; लाचखोर भू-करमापक गजाआड

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add