• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक रंगभूमी दिन साजरा

चित्रकला स्पर्धा, नाट्यछटा सादरीकरण व बालक सुसंवादाने रंगला कार्यक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 28, 2025
in जळगाव जिल्हा
0
बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक रंगभूमी दिन साजरा

जळगाव, (प्रतिनिधी) : जगातील सर्व प्रयोगशील कलांचा उत्कर्ष व्हावा यासाठी जगभरात ‘जागतिक रंगभूमी दिन’ साजरा करण्यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्टिटय़ूटने १९६१ सालापासून मोठे प्रयत्न सुरू केले होते. २७ मार्च १९६२ पासून जागतिक रंगभूमी दिन जगभरात साजरा करण्यात येत आहे. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे चित्रकला स्पर्धा, नाट्यछटा सादरीकरण व बालक सुसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवारी जागतिक रंगभूमी दिन निमित्त बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे गुरुवर्य परशूराम विठोबा प्राथमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गणेश वंदना, नटराज पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक, शिक्षक कल्पना तायडे, योगेश भालेराव, कामगार अधिकारी भानुदास जोशी, गौरव लवंगाळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक विनोद ढगे यांनी केले तर योगेश शुक्ल यांनी जागतिक रंगभूमी दिनाचे महत्व सांगून, बालरंगभूमी परिषदेच्या आगामी उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय सणांची माहिती व्हावी या उद्देशाने भारतीय सण या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत २०० विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी सहभाग घेतला होता. चित्रकला स्पर्धेनंतर विद्यार्थिंनींनी नाट्यछटांचे सादरीकरण केले. कार्यक्रमात शेवटी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधत, मोबाईल व त्याचे दुष्परिणा, जीवनात असलेले कलांचे महत्व याविषयी माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत.

यावेळी गुरुवर्य परशूराम विठोबा प्राथमिक विद्यालयात बालरंगभूमी परिषदेच्या बालरसिक मंचची स्थापना करण्यात आली. जागतिक रंगभूमी दिनाच्या औचित्याने राबविलेल्या बालरंगभूमी परिषदेने राबविलेल्या बालप्रेक्षक सभासद नोंदणी उपक्रमात विविध शाळांमधील ६४० विद्यार्थी-विद्यार्थिंनी बालरंगभूमी परिषदेचा ऑनलाईन गुगल फॉर्म भरून बालप्रेक्षक म्हणून आपली नोंदणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी नेहा पवार, आकाश बाविस्कर, दिपक महाजन, हर्षल पवार, मोहित पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, आकाश भावसार, मनोज जैन व बालरसिक मंचचे समन्वय योगेश भालेराव यांनी परिश्रम घेतले.


 

Next Post
चारित्र्याच्या संशयावरून पतीने कुऱ्हाडीने हल्ला करत पत्नीला केले ठार

चारित्र्याच्या संशयावरून पतीने कुऱ्हाडीने हल्ला करत पत्नीला केले ठार

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add