• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार यांचा नूतन मराठा महाविद्यालयातर्फे सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 28, 2025
in जळगाव जिल्हा
0
पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार यांचा नूतन मराठा महाविद्यालयातर्फे सत्कार

जळगाव, (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावात शाश्वत विकासाचे प्रयोग करून गावाचा सर्वांगीण विकास करणारे पद्मश्री चैत्राम पवार यांचा सत्कार सोहळा जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित,जळगाव संचलित नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी डॉ. रणजीत चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्या हस्ते सत्कारमूर्ती पद्मश्री चैत्राम पवार यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी मा. डॉ.रणजीतजी चव्हाण यांनी ‘चालते बोलते विद्यापीठ म्हणजे चैत्रामजी पवार’ या शब्दात त्यांचा गौरव केला.त्यांना स्वतःला आलेले अनुभव कथन करून उपस्थितांना बारीपाडा गाव आणि चैत्रामजी पवार यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री चैत्राम पवार यांनी बारीपाडा हे छोटेसे गाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे पोहोचविले, याबद्दल माहितीपट दाखविण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पद्मश्री चैत्राम पवार यांनी सांगितले की स्वतः उच्चशिक्षित असून नोकरी न पत्करता घरच्यांचा विरोध पत्करून गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले. त्यासाठी घरातील, गावातील लोकांची मने वळवून त्यांना या कामात सहभागी करून घेतले. ‘जल, जंगल, जमीन, जन, जनावर’ या पंचसूत्रीनुसार अनेक अडचणींना सामोरे जात बारीपाडा हे आदिवासी गाव जगाच्या नकाशावर दुसऱ्या क्रमांकाचे आदर्श गाव बनविले. त्यांच्या प्रवासात त्यांना जशी इतरांची मदत मिळाली,तसेच विरोधकही निर्माण झाले. परंतु त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. त्यांच्या या कार्यास नूतन मराठा महाविद्यालयातर्फे सत्कार करून प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शितल पाटील यांनी केले. आभार प्रा. तेजल पाटील यांनी मांडले. कार्यक्रमास महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.के.बी. पाटील, उपप्राचार्या एम. एस.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील, प्रा.इंदिरा पाटील, प्रा. ललिता हिंगोणेकर, प्रा. डी.आर.चव्हाण, प्रा.एन.जे.पाटील, प्रा राकेश गोरसे, प्रा. बाळासाहेब सुर्यवंशी, प्रा डॉ मंगला तायडे, प्रा वंदना पाटील, प प्रा. सुनील गरुड कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. आर .बी. देशमुख यांनी मेहनत घेतली तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Next Post
शेंदुर्णी येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास गुढीपाडव्यापासून प्रारंभ

शेंदुर्णी येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास गुढीपाडव्यापासून प्रारंभ

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add