• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेंदुर्णी येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास गुढीपाडव्यापासून प्रारंभ

जामनेर तालुक्यात शतकोत्तर परंपरेचे यंदा १०४ वे वर्ष

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 28, 2025
in धार्मिक
0
शेंदुर्णी येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास गुढीपाडव्यापासून प्रारंभ

शेंदुर्णी, (प्रतिनिधी) : खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णी येथील थोर भगवत् भक्त, खान्देशातील विख्यात संतकवी भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व गोविंदराव पारळकर यांच्या अथक परिश्रमाने, ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असुन यंदाचे उत्सवाचे हे १०४ वे वर्ष आहे. चै.शु.प्रतिपदा दि.३० मार्च २०२५ रविवार ते चै.शु.अष्टमी दि.५ एप्रिल २०२५ शनिवार पावेतो दररोज रात्री ८-३० वाजता धार्मिक कार्यक्रम होतील.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार,किर्तनभुषण ह.भ.प. स्नेहलताई पित्रे (डोंबिवली -मुंबई) यांचे सुश्राव्य कीर्तन श्रीराम मंदिराच्या समोर आयोजित करण्यात आले. त्यांना हार्मोनियम वरदुर्गा मुंडले (कुडाळ) तर तबल्यावर लव आडसुळ (सांगली) हे साथसंगत करणार आहे.चै.शु.नवमी ६ एप्रिल रविवारी सकाळी १० वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत यांचे पारंपरिक श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन होणार आहे. यासाठी हभप वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, शेंदुर्णी यांची साथसंगत लाभणार आहे.

दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा व प्रसादाचे वितरण करण्यात येईल. रात्री ८ वाजता श्रीची शहरातुन सवाद्य पालखी मिरवणुक काढली जाणार असून यात हभप वारकरी संप्रदाय भजनी मंडळ व हरिपाठ महिला भजनी मंडळ शेंदुर्णी, ग्रामस्थ मंडळी यांचा सहभाग राहणार आहे. तरी सर्व भाविक सज्जनांनी या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन उदारतेने आर्थिक सहकार्य करावे अशी विनंती चालक श्रीरामचंद्र देवस्थान, शेंदुर्णी यांनी केली आहे.

 


 

Next Post
सीएच्या घरात चोरट्याने केला हात साफ ; संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

सीएच्या घरात चोरट्याने केला हात साफ ; संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

ताज्या बातम्या

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई
गुन्हे

विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

August 27, 2026
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पातोंडा शिवारातून खताच्या बॅगा लांबवणारी टोळी जेरबंद ; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add