• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भरधाव बसच्या धडकेत शेतकरी ठार ; यावल तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 28, 2025
in जळगाव जिल्हा
0
भरधाव बसच्या धडकेत शेतकरी ठार ; यावल तालुक्यातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतकी शाळेसमोर भरधाव बसने दुचाकीस्वाराला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि.२६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

अशोक यशवंत सपकाळे (वय ६८, रा. किनगाव ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, मुलगा, सून, ३ मुली यांचेसह राहत होते. एका बँकेत काम करून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यानंतर ते शेती काम करीत होते. दरम्यान किनगाव येथून शेताकडे बुधवारी सकाळी ते जात असताना त्यांची दुचाकी (एमएच १९ एटी ८५८८) शेतकी शाळेसमोर आली असताना एसटी महामंडळाची बस (एमएच १४ बीटी २१४४) हिने अशोक सपकाळे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या धडकेत अशोक सपकाळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना किनगाव आरोग्य केंद्रात आणल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. जळगाव रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे किनगाव येथे शोककळा पसरली आहे. घटनास्थळी यावल पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेली. तर यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Next Post
पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार यांचा नूतन मराठा महाविद्यालयातर्फे सत्कार

पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार यांचा नूतन मराठा महाविद्यालयातर्फे सत्कार

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add