जळगाव, (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने ट्रेन एलएचबी कोच आणि सुधारित संरचनेसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी कृपया वरील बदल लक्षात घेऊन प्रवास करावा, असे आवाहन भुसावळ विभागाने केले आहे.
कोल्हापुर-गोंदिया- कोल्हापुर एक्सप्रेस..
ट्रेन क्रमांक ११०३९कोल्हापूर – गोंदिया एक्सप्रेस दिनांक ०१.०६.२०२५ पासून कोल्हापूर येथून एलएचबी कोच आणि सुधारित संरचनेसह चालेल. ट्रेन क्रमांक ११०४० गोंदिया – कोल्हापूर एक्सप्रेस दिनांक ०३.०६.२०२५ पासून गोंदिया येथून एलएचबी कोच आणि सुधारित संरचनेसह चालेल. ११०३९/११०४० कोल्हापूर -गोंदिया – कोल्हापूर एक्सप्रेस ट्रेनची सुधारित संरचना १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार अशी राहणार आहे.
कोल्हापूर- पुणे -कोल्हापूर एक्सप्रेस..
ट्रेन क्रमांक ०१०२३ कोल्हापूर – पुणे एक्सप्रेस दिनांक ०४.०६.२०२५ पासून कोल्हापूर येथून एलएचबी कोच आणि सुधारित संरचनेसह चालेल. गाडी क्रमांक ०१०२४ पुणे – कोल्हापूर एक्सप्रेस दिनांक ०५.०६.२०२५ पासून पुणे येथून एलएचबी कोच आणि सुधारित संरचनेसह चालेल. ०१०२३/०१०२४ कोल्हापूर- पुणे -कोल्हापूर एक्सप्रेस ट्रेनची सुधारित संरचना १ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार अशी राहील.