• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बँकेत पैसे भरण्यासाठी जाताना वृद्ध महिलेचे ८५ हजार रुपये लंपास

मुक्ताईनगर सेंट्रल बँक येथील प्रकार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 26, 2025
in गुन्हे
0
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : शहरातील बोदवड रोड लगत असलेल्या सेंट्रल बँकेच्या शाखेतून वृद्ध महिला शेतकरी तुरी विकून आलेले पैसे जमा करण्यासाठी आल्या असता कापडी पिशवीतून ८५ हजार रुपये लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान घडली. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील ६२ वर्षीय महिला शेतकरी बेबाबाई प्रभाकर काळे यांनी त्यांच्या शेतातील तूर ही बोदवड येथील एका व्यापाऱ्याला विकली. त्या मोबदल्यात ८५ हजार रुपये मिळाले होते. सदर ८५ हजार रुपये रक्कम मुक्ताईनगर येथील सेंट्रल बँकेत जमा करण्यासाठी त्या व त्यांचा मुलगा सुधाकर हे दोघेही आले होते. वृद्ध महिला शेतकरी बँकेत पैसे जमा करण्यासाठी एका हिरव्या रंगाच्या कापडी पिशवीत रक्कम घेऊन रांगेत उभ्या होत्या. ज्यावेळेस बँकेत रक्कम भरण्याची वेळ आली तेव्हा त्या महिलेने पिशवीत पाहिले असता पिशवी खालून कापून त्यातून पैसे लंपास केल्याचे आढळून आले.

वृद्ध महिलेने कष्टातून कमविलेली रक्कम अचानक चोरीस गेल्याने सदर महिलेला मोठा धक्का बसला व इकडे तिकडे त्यांच्या मुलाच्या मदतीने शोधू लागल्या. परंतु ती रक्कम आढळून आली नाही. पिशवीमध्ये पाचशे रुपयांच्या १७० नोटा होत्या. यापूर्वी सुद्धा बँकेतून रक्कम चोरी जाण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आरोपी सीसीटीव्ही कॅमेरा दिसत असून सुद्धा बऱ्याचदा चोरी गेलेल्या रक्कम परत मिळू शकलेली नाही. बेबाबाई प्रभाकर काळे यांनी थेट पोलिसात धाव घेतली व त्या ठिकाणी त्यांनी फिर्याद नोंदवली.

या फिर्यादनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान या ठिकाणी पोलीस अधिकारी यांनी सुद्धा तात्काळ घटनास्थळी धाव घेत सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली तसेच सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले.


 

Next Post
कॉफीशॉपच्या नावाखाली आत मुलामुलींचे अश्लील चाळे ; पोलिसांची धाड

कॉफीशॉपच्या नावाखाली आत मुलामुलींचे अश्लील चाळे ; पोलिसांची धाड

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add