• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अहिल्यादेवींच्या कार्यकर्तुत्वाचे नाट्यात्मक सादरीकरण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
अहिल्यादेवींच्या कार्यकर्तुत्वाचे नाट्यात्मक सादरीकरण

जळगाव, (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीजन्मशताब्दी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्रीजन्मशताब्दी दिनानिमित्त अहिल्यादेवींना वंदन करणारा, नमन करणारा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण जळगाव येथे रविवारी २३ मार्च रोजी सायंकाळी संभाजीराजे नाट्यगृहात करण्यात आले.

यात शाहिरी-पोवाडे, नृत्य, नाट्य, संगीत अशा विविध कलांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाची निर्मिती परिवर्तन संस्थेच्यावतीने शंभू पाटील व नारायण बाविस्कर यांनी केली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, उद्योजक किरण बच्छाव, सुरेंद्र पाटील, नहीचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, आर्किटेक शिरिष बर्वे, नारायण बाविस्कर, सुभाष सोनवणे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

परिवर्तनच्यावतीने या नाट्यप्रयोगाची निर्मिती करण्यात आली. कार्यक्रमाचे दिग्दर्शक हर्षल पाटील, नाट्य दिग्दर्शक हनुमान सुरवसे, संगीत दिग्दर्शक शरद भालेराव, नृत्य दिग्दर्शक नाना सोनवणे यांचे होते. ७० कलावंतांचा सहभाग असलेले नाटकात अहिल्याबाईंच्या जीवनातील विविध प्रसंगांची नाट्यात्मक मांडणी करून सादर केले होते. आकर्षक वेशभूषा, प्रभावी संगीत, उत्तम शाहिरी साथ, गाणी, नृत्य आणि अभिनेत्यांनी केलेला उत्तम अभिनय याद्वारे हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रभावीपणे सादर झाला. प्रेक्षागृहात अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

अहिल्यादेवींच्या जिवनावरील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभागाचे विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांचे सहकार्य लाभले होते. अहिल्यादेवींचं कार्य हे आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असून या थोर समाजसेवी कर्तृत्ववान महिलेच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी यासाठी ही निर्मिती केल्याचे शंभू पाटील यांनी सांगितले. नाटकात नेहा पवार, दिपक महाजन, तन्वी काटकर, गणेश सोनार, मंगेश कुलकर्णी, होरिलसिंग राजपूत, अक्षय नेहे, योगीता भालेराव, विकास वाघ, गणेश सोनार, पवन भोई यांच्यासह ६० कलावंत सहभागी होते. रंगभूषा चिंतामण पाटील यांनी केली होती, वेशभुषा अजय पाटील यांची होती. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कलावंतांचा सन्मान करण्यात आला.


 

Next Post
रावेर तालुक्यात १५ किमी शेत रस्ते मोकळे ; ७५० हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा

रावेर तालुक्यात १५ किमी शेत रस्ते मोकळे ; ७५० हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add