• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रावेर तालुक्यात १५ किमी शेत रस्ते मोकळे ; ७५० हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
रावेर तालुक्यात १५ किमी शेत रस्ते मोकळे ; ७५० हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील शेत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून १५ किलोमीटर लांबीचे रस्ते मोकळे करण्यात आले, त्यामुळे ७५० हून अधिक शेतकऱ्यांना शेतीसाठी वाहतुकीचा मार्ग सुकर झाला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार महसूल प्रशासनाने ही मोहीम राबवली.

गेल्या काही वर्षांत या भागातील शेत रस्त्यांवर अनधिकृत अतिक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रशासनाने तातडीने पावले उचलत ही अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली. तहसील प्रशासन, महसूल विभाग व पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत १५ किलोमीटर लांबीचे शेत रस्ते मोकळे करण्यात आले, ज्याचा थेट फायदा ७५० हून अधिक शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी दिली.

या मोहिमेमुळे शेतकरी वर्गाला शेतीसाठी आता अधिक सुलभ आणि मोकळा मार्ग उपलब्ध झाला आहे. भविष्यातही अशाच प्रकारे सातत्याने कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. निभोरा मंडळ,खिर्डी मंडळ, सुनोदा शेतरस्ता, खानापुर मंडळ, खानापुर निरुळ शिवरस्ता, खिडी मंडळ, सुनोदा शेतरस्ता, सावदा मंडळ, उदळी लुमखेडा शिव रस्ता, खानापुर मंडळ, अजनाड जुने गावठाण, ऐनपुर मंडळ, धामोडी शेतरस्ता, ऐनपुर मंडळ, धामोडी शिगांडी शिवार, अजंदा ते नांदुखेडा शिवरस्ता या ठिकाणचे शेत रस्त्यातील अतिक्रमण काढण्यात आली.

Next Post
सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज.. – आ. एकनाथराव खडसे

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज.. - आ. एकनाथराव खडसे

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
खान्देश

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add