• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, वृद्ध जखमी ; जामनेर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, वृद्ध जखमी ; जामनेर तालुक्यातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील शहापूर रस्त्यावर दुचाकीला भरधाव छोटा हत्ती वाहनाने दिलेल्या जबर धडकेत इसमाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

आनंदा तुळशीराम शेळके (वय ५०, रा. कासली ता. जामनेर) असे मयत इसमाचे नाव आहे. कासली गावात ते पत्नी, १ मुलगा यांचेसह राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, आनंदा शेळके हे गावातील वयोवृद्ध धनराज दत्तात्रय पाटील (वय ७२) यांचेसह जामनेर येथे दुचाकीने बुधवारी दि. १९ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जात होते. शहापूर रस्त्यावर पेट्रोलपंपाजवळ दुचाकी आली असताना त्यांना समोरून येणाऱ्या छोटा हत्ती वाहनाने जबर धडक दिली. यात आनंदा व धनराज पाटील हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

दोघांनाही जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात धनराज पाटील यांना किरकोळ मार लागला आहे. तर डोक्याला जबर मार लागल्यामुळे आनंदा शेळके यांचा उपचारादरम्यान, साडे सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे कासली गावावर शोककळा पसरली आहे.

Next Post
५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

ताज्या बातम्या

वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार
जळगाव जिल्हा

वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार

October 12, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add