• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आगीत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

स्वयंपाक करताना घडली होती घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
आगीत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर शहरातील एका ४० वर्षीय महिलेचा स्वयंपाक करताना आग लागून जळाल्यामुळे प्रकृती गंभीर होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. १८ मार्च रोजी मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मंगला सुनील लोंढे (वय ४०, रा.बिस्मिल्ला नगर, जुना बोदवड रोड, जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती, ३ मुले, ३ मुली असा परिवार आहे. त्यांचे पती पशुपालन व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी दि. ६ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरी गॅस शेगडीवर स्वयंपाक करीत असताना अचानक आग लागल्याने महिलेच्या साडीने पेट घेतला. त्यात महिला गंभीर जखमी झाली.

कुटुंबीयांनी सुरुवातीला जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे १२ दिवस मंगला यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर उपचारादरम्यान मंगळवारी दि. १८ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालविली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. महिलेच्या मृत्यूमुळे जामनेर शहरात शोककळा पसरली आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
शुल्लक कारणावरून माजी उपसरपंचाचा निर्घृण खून

शुल्लक कारणावरून माजी उपसरपंचाचा निर्घृण खून

ताज्या बातम्या

वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार
जळगाव जिल्हा

वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार

October 12, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add