• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आर. एल. ज्वेलर्स वरील फसवणुकीचा ठपका एसबीआय ने हटविला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 11, 2025
in जळगाव जिल्हा
0
आर. एल. ज्वेलर्स वरील फसवणुकीचा ठपका एसबीआय ने हटविला

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून लावण्यात आलेला फसवणुकीचा ठपका हटवण्यात आला असून बँकेने अधिकृत पत्राद्वारे कंपनीला ही माहिती दिली आहे. बँकेने पाठवलेल्या पत्रासंदर्भात माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी मनीष जैन व कुटुंबीय उपस्थित होते. ‘आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा दिवाळीचा दिवस आहे. सत्याचा विजय होतोच, फक्त थोडा उशीर होतो,’ असे जैन यांनी सांगितले.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फसवणूक ओळख समितीने १३ मे २०२० रोजी झालेल्या बैठकीत आर.एल. ग्रुप कंपनीचे खाते फसवणूक श्रेणीत वर्गीकृत केले होते. हा अहवाल नंतर रिझर्व्ह बँकेला (RBI) सादर करण्यात आला आणि खाते सेंट्रल फ्रॉड रजिस्टरमध्ये नोंदवले गेले. मात्र, कंपनीने या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले होते. बँकेने पत्रात स्पष्ट केले आहे की, फसवणूक म्हणून श्रेणीकरण करताना कंपनीला आपली बाजू मांडण्याची संधी न दिल्यामुळे हा ठपका हटवण्यात आला आहे. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीच्या खात्यावरील फसवणुकीची नोंद अधिकृतरित्या काढण्यात आली आहे.

राजमल लखीचंद ज्वेलर्सला वरीव बँकेने हा ठपका हटवला असला तरी, हा निर्णय अंतिम नसून, RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भविष्यात तपास पुन्हा सुरु केला जाऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. यांना व्यवसायिक दृष्टिकोनातून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या प्रतिमेवर सकारात्मक परिणाम होणार असून, भविष्यातील व्यवहारांवरही परिणाम होणार आहे.

सीबीआय, ईडी कारवाई..
स्टेट बँक ऑफ इंडियाने लावलेल्या ठपक्यामुळे कंपनीवर सीबीआय (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) मार्फत कारवाई झाली होती. बँकेचा ठपका हटवल्याने पुढील सर्व चौकशी व कारवाई थांबण्याची शक्यता आहे, असा विश्वास ईश्वरलाल जैन यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, SBI ने चुकीची कारवाई केल्याबद्दल दिलगीर असावे, यासाठी आम्ही त्यांना पत्र देणार आहोत, असेही जैन यांनी सांगितले.

Next Post
कोल्ड्रींग्जची बाटली डोक्यात मारून गंभीर दुखापत ; डेअरी दुकानदार जखमी

कोल्ड्रींग्जची बाटली डोक्यात मारून गंभीर दुखापत ; डेअरी दुकानदार जखमी

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add