चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावामध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने जिवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. त्यातून ती गरोदर राहिली. या घटनेप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यात एका गावामध्ये १५ वर्षीय मुलगी ही कुटुंबासह राहते. मजुरी काम करून तिचा परिवार उदरनिर्वाह करतो. दरम्यान दि. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान वारंवार संशयित आरोपी शांतीलाल वसंत पावरा याने, मी तुझ्याशी प्रेम करतो. तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणून त्याच्या घरात तरुणीवर वारंवार बलात्कार केला आहे.
या अत्याचारातून ही मुलगी गरोदर राहिली. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी संशयित आरोपी शांतीलाल पावरा याने तरुणीला दिली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे तपास करीत आहेत. संशयित आरोपी शांतीलाल पावरा याला अटक करण्यात आली आहे.