• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणीला घेण्यास गेलेल्या भावाचा भीषण अपघात, उपचारादरम्यान मृत्यू !

मध्यप्रदेशातील घटना, जळगाव तालुक्यातील असोद्यात शोककळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
बहिणीला घेण्यास गेलेल्या भावाचा भीषण अपघात, उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव (विशेष प्रतिनिधी) : दुसऱ्या दिवशी बहिणीचा साखरपुडा असल्याने घरी येत असलेल्या बहिणीला बऱ्हाणपूर येथे घेण्यासाठी नेपानगर येथून कारने निघालेल्या भावाच्या वाहनाचा दि. १५ फेब्रुवारी रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरु असताना तरुणाचा सोमवारी उपचारादरम्यान सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. ते मूळचे जळगाव तालुक्यातील असोदा येथील असल्याने शोककळा पसरली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

मुकुल उमेश बऱ्हाटे (वय २४, रा. डाभीयाखेडा जि. नेपानगर, मध्यप्रदेश, मूळ असोदा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो नेपानगर येथे आई, वडील, बहिण यांच्यासह राहत होता. अभियांत्रिकी शाखेत शिक्षण झाल्यावर मुकुल हा पुणे येथे आयटी कंपनीत कामाला होता. मुकुलचे वडील शेती काम करतात. अनेक वर्षांपासून ते नेपानगर येथेच वसलेले आहे. दरम्यान, मुकुलची बहीण खुशबू हीचा साखरपुडा दि. १६ रोजी असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. त्याकरिता खुशबू हि पुणे येथून बऱ्हाणपूर येथे आली होती. तर तिला घेण्यासाठी नेपानगर येथून मुकुल कारने एकटाच निघाला होता. दि. १५ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास मुकुलचा नेपानगर ते बऱ्हाणपूर दरम्यान भीषण अपघात झाला.

त्याला ग्रामस्थांनी बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. तेथून जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे मुकुलवर उपचार सुरु होते. दरम्यान, सोमवारी उपचारादरम्यान दि. ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मुकुलची प्राणज्योत मालविली. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा एकच आक्रोश केला. मुकुलचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

Next Post
अवघ्या २४ तासांत दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल ; आरोपींना अटक

अवघ्या २४ तासांत दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल ; आरोपींना अटक

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add