• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘छावा’ चित्रपट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘छावा’ चित्रपट

जळगाव, (प्रतिनिधी) : ‘कुठलाही इतिहास हा शौर्य, पराक्रम, कठिणातून कठिण प्रसंगातही ध्येय कसे साधायचे, आपल्या जवळ जे आहे त्या संसाधनांमध्ये विजयश्री कशी मिळवावी हे शिकवतो. त्याकडे बघण्याची दृष्टी मात्र तशी पाहिजे.’ लेखन, ग्रंथ, गड, किल्ले, बुरुज, मंदिर हे इतिहासात घडलेल्या गोष्टी, घटनांचे आज ही साक्षीदार आहेत.

ह्याच इतिहासात गुलामगिरीला झुगारून जनतेच्या प्रती असलेल्या आस्थेमुळे स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र हालअपेष्टा सहन करून स्वराज्यावरील प्रत्येक आक्रमणाला तोडीसतोड उत्तर देणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या शुर पराक्रमांची कहाणी ऐकली, बघितली तर आजही प्रेरणा मिळत असते. या प्रेरणेतूनच स्वराज्य रक्षक आदर्श समाज घडावा, यासाठी शाळकरी मुलांना इतिहासातील बारकावे लक्षात यावे या हेतूने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन यांनी अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी ‘छावा’ चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध करून दिली.

शहरातील अत्याधुनिक चित्रपट गृहामध्ये ‘छावा’ चित्रपटाची अनुभूतीच्या इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी घेतली. शिक्षक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी असे एकून २६७ जणांनी एकाच वेळी तीन स्क्रीन वर छावा चित्रपट बघितला. यासाठी प्राचार्या रश्मी लाहोटी, जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर, रूपाली वाघ यांच्यासह सर्व शिक्षकवृदांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

▪️‘श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी गरिब मुलांना उच्च प्रतिचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या हेतूने अनुभूती स्कूल सुरू केली. महाराष्ट्रात अनेक वीर योद्धा होऊन गेले त्यांचा खरा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी जेणे करून त्यांना प्रेरणा मिळेल यासाठी विद्यार्थ्यांना चित्रपट दाखविण्यासाठी घेऊन आलो. आदरणीय अशोकभाऊ, अतुलभाऊ व निशाभाभीजींसह संचालक मंडळांनी ही व्यवस्था उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते.’
रश्मी लाहोटी, प्राचार्या, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल

▪️‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र विद्यार्थ्यांना समजावे त्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी अनुभूती स्कूलच्या व्यवस्थापनाने ‘छावा’ चित्रपटाची संधी उपलब्ध करुन दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!’
मनिषा प्रशांत मल्हारा, इतिहास शिक्षिका, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल


 

Next Post
कंपनीत गुंतवणूकीचे आमिष ; महिलेला तब्बल ६६ लाखांत गंडविले !

कंपनीत गुंतवणूकीचे आमिष ; महिलेला तब्बल ६६ लाखांत गंडविले !

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add