• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कंपनीत गुंतवणूकीचे आमिष ; महिलेला तब्बल ६६ लाखांत गंडविले !

जळगाव शहरातील कुटुंबियांवर गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
कंपनीत गुंतवणूकीचे आमिष ; महिलेला तब्बल ६६ लाखांत गंडविले !

जळगाव (प्रतिनिधी) : येथील ३१ वर्षीय महिलेची हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ६६ लाख ४० हजार ५ रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांविरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

माधुरी अनिल चांदोरीकर (वय ३१,रा. रासने नगर, सावेडी, अहमदनगर) यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. जळगाव शहरातील हॉटेल चाय शाय बारमध्ये दि. ३१ जुलै २०२३ ते दि. १ मार्च २०२५ पावेतो दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शनिवारी दि. १ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी माधुरी चांदोरीकर यांना संशयित आरोपी आशा कमलेश रूपाणी, कमलेश हेमचंद्र रूपाणी, दीपेश कमलेश रूपाणी, आश्लेष कमलेश रूपाणी (सर्व रा. खामगाव जि. बुलढाणा, ह. मु. पर्पल व्ह्यू अपार्टमेंट, शिवम कॉलनी, जळगाव) आणि आकाश सिद्धू वर्मा (वय ३२) यांनी हर्बललाईफ कंपनीत गुंतवणूक करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले.

दि. ३१ जुलै २०२३ ते आज पावेतो फिर्यादी माधुरी चांदोरीकर, त्यांचे पती व नातेवाईक यांच्याकडून तब्बल ८६ लाख ६४ हजार ९९९ रुपये इतकी रक्कम बँक खाते, सीडीएम मशीन आणि रोख स्वरूपात संशयित आरोपींनी घेतले आहेत. तसेच फिर्यादीला २० लाख २४ हजार ९९४ रुपयांचा नफा परतावा म्हणून दिला आहे. परंतु फिर्यादीने केलेल्या गुंतवणुकीवर पुढील अपेक्षित परतावा मागितला असता फिर्यादीला संशयित आरोपींकडून परतावा देण्यात आला नाही. फिर्यादीची मुद्दल ६६ लाख ४० हजार ०५ रुपयांची रक्कम परत न करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. दरम्यान एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्यामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. गुंतवणूक करून अधिक रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळ्या जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

Next Post
भावाच्या पत्नीवर चुलत भावाने केला अत्याचार !

भावाच्या पत्नीवर चुलत भावाने केला अत्याचार !

ताज्या बातम्या

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 23, 2026
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला
महाराष्ट्र

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

July 23, 2026
एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add