• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लक्झरी बसची रिक्षाला धडक : अपघातात महिलेचा जागीच मृत्यू, २ जखमी

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे अपघात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
लक्झरी बसची रिक्षाला धडक : अपघातात महिलेचा जागीच मृत्यू, २ जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथे पुन्हा दुसऱ्या दिवशी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये भाजी विक्रेता महिला ठार झाली असून दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

रत्‍नाबाई गणेश हिवाळे (वय ४०, रा.लोहारा ता. पाचोरा) असे मयत महिलेचे नाव आहे. पती व मुलासह ती लोहारा गावात भाजी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होती. दरम्यान मंगळवारी दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास लोहारा येथून रत्‍नाबाई ह्या जळगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी घेण्यासाठी बापू भास्कर चौधरी यांच्या रिक्षा मधून येत होत्या. दरम्यान कुसुंबा गावाजवळ रिक्षा आली असताना विराज ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षा पलटी झाली. यामध्ये रत्‍नाबाई या बाहेर फेकल्या जाऊन दिशादर्शक फलकाच्या खांब्याला त्यांचे डोके आदळल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या.

तर रिक्षा चालक बापू भास्कर चौधरी आणि रिक्षातील आणखी एक जण गणेश बाबुलाल जाधव (वय २८ रा. रोटवद तांडा ता.जामनेर) हे जखमी झाले. दरम्यान पोलिसांना घटना घडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व मयत यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

लोहारा येथे घटना घडताच ग्रामस्थांनी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती. दरम्यान रत्‍नाबाई हिवाळे यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. तर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. सलग दुसऱ्या दिवशी कुसुंबा येथे अपघात झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी रिक्षाच्या धडकेत वृद्ध पुजाऱ्याचा मृत्यू झाला होता.

Next Post
आरोग्यसेवकाचा शिरसोली रस्त्यावर अपघात ; उपचारादरम्यान मृत्यू !

आरोग्यसेवकाचा शिरसोली रस्त्यावर अपघात ; उपचारादरम्यान मृत्यू !

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add