• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आरोग्यसेवकाचा शिरसोली रस्त्यावर अपघात ; उपचारादरम्यान मृत्यू !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
आरोग्यसेवकाचा शिरसोली रस्त्यावर अपघात ; उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव, (प्रतिनिधी) : अनेक वर्षांपासून शिरपूर येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा जळगाव येथे आल्यावर म्हसावद येथील घरी जात असताना रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने झालेल्या भीषण अपघातात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

नितीन भाऊलाल वानखेडे (वय ४०, रा. म्हसावद ता. जळगाव) असे मयत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ते म्हसावद येथे आई-वडील, पत्नी, चार मुले यांच्यासह राहत होते. सध्या शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून ते सेवा बजावत होते. अनेक वर्ष शिरपूर येथे सेवा बजावल्यानंतर आता जळगावला बदली करून घेण्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यासाठी शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ते प्रशासकीय काम झाल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता म्हसावद येथे घरी दुचाकीने परतत होते. अचानक रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने त्यांचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला.

या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान कुटुंबीयांनी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान ४ दिवसानंतर मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली. (केपी)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान आरोग्यसेवकाच्या मृत्यूमुळे म्हसावद गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Next Post
पुरातन महादेव मंदिरात चोरी ; सोन्याचे कवच, त्रिशूल, पितळी नाग लंपास

पुरातन महादेव मंदिरात चोरी ; सोन्याचे कवच, त्रिशूल, पितळी नाग लंपास

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add