• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बांधकाम मजुरांच्या अंगावर वाळू पडल्याने झोपेतच मृत्यू 

जालना जिल्ह्यात घडली घटना ; जामनेर तालुक्यातील मजूरही ठार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
बांधकाम मजुरांच्या अंगावर वाळू पडल्याने झोपेतच मृत्यू 

जाफराबाद, (वृत्तसेवा) : टिप्परचालकाने शेडवर वाळू टाकल्याने पत्रा तुटुन आतमध्ये झोपलेल्या पाच बांधकाम मजुरांच्या अंगावर वाळू पडली आणि त्यांचा वाळूखाली दबल्याने गुदमरून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास जालना जिल्ह्यातील पासोडी ता. जाफराबाद येथे घडली.

गणेश काशीनाथ धनवई (५०), भूषण गणेश धनवई (१५, दोघे रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर), राजेंद्र दगडूबा वाघ (४२, रा. दहिद, ता. जि. बुलढाणा), सुनील समाधान सपकाळ (२० रा. पद्मावती, ता. भोकरदन), सुपडू मधुकर आहेर (वय-३८ रा. तोंडापूर, ता. जामनेर) अशी मृतांची नावे आहेत. टिप्परचालक संतोष शेषराव कोल्हे (रा. जाफराबाद) व टिप्परमालक गोपाल गवळी (रा. खापरखेडा) यांना जाफराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पासोडी शिवारात भारज-पासोडी मार्गावरील चांडोळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. येथे ही दुर्घटना घडली.

बांधकामाच्या शेजारी तयार केलेल्या याच शेडमध्ये मजूर राहत होते. रस्त्याच्या कामासाठी लागणारी वाळू घेऊन आलेल्या टिप्परचालकाने शेडवरच वाळू टाकल्याने ही घटना घडली. वाळूखाली दबून ठार झालेल्या पाच मजुरांमध्ये तोंडापूर ता. जामनेर येथील सुपडू मधुकर जिरी (३८) यांचा समावेश आहे. सुपडू आहेर यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Next Post
मुक्ती फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य शिबिर व स्वच्छता अभियान

मुक्ती फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य शिबिर व स्वच्छता अभियान

ताज्या बातम्या

रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर
गुन्हे

रस्ता सुरक्षा मोहीम: ‘कर्कश’ सायलेन्सरसह फॅन्सी नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर

April 24, 2026
ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
गुन्हे

ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बनावट कॉल सेंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

April 24, 2026
महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश
आरोग्य

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 24, 2026
डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा
जळगाव जिल्हा

डॉ.वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा

April 24, 2026
जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न
जळगाव जिल्हा

जळगावात लेवा पाटीदार महासंघाच्या कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन संपन्न

April 24, 2026
JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर
क्रिडा

JCL T-20: चाळीसगाव चॅलेंजर्सचा थरारक विजय; तर रावेर रॉयल्स स्पर्धेबाहेर

April 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group