• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडविण्याची धमकी !

बुलडाणा जिल्ह्यातून संशयित आरोपींना पोलिसांकडून अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडविण्याची धमकी !

बुलडाणा, (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून मुंबई गुन्हे शाखा आणि बुलडाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपासादरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही गावातून दोघे तरुणांना अटक केली आहे. सध्या पोलिसांनी त्यांना मुंबईकडे रवाना केले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश अच्युतराव वायाळ (वय-३५) आणि अभय गजानन शिंगणे (वय-२२) असे अटकेतील दोघांचे नाव आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बनं उडवण्याची धमकी गोरेगाव पोलीस ठाण्यात ई-मेलद्वारे देण्यात आली होती. या धक्कादायक घटनेमुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने ई-मेलचा स्रोत शोधून काढला आणि संबंधित आयपी अॅड्रेसच्या मदतीने आरोपींच्या ठिकाणाचा शोध घेतला. या तपासादरम्यान, मुंबई आणि बुलडाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने देऊळगाव मही गावात छापा टाकून दोघांना अटक केली.

संशयित मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे हा मोबाईल शॉपी चालवतो. विशेष म्हणजे, हे दोघेही नात्याने आतेभाऊ-मामेभाऊ आहेत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की, आरोपींना दारूचे व्यसन असून अभय शिंगणेच्या मोबाईल शॉपीमधूनच हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. तपास यंत्रणांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेले आहे. गुरुवारी सकाळी गोरेगाव पोलीस ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी असलेला ई-मेल आला. यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. ही धमकी केवळ गोरेगावच नव्हे, तर मुंबईतील इतर पोलीस ठाण्यांनाही पाठवण्यात आली होती. ई-मेलमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा स्पष्ट उल्लेख होता. यावरून पोलीस अधिक सतर्क झाले आणि गुन्हा दाखल करत तपासयंत्रणांनी आरोपींना शोधण्यास सुरुवात केली.

Next Post
तरुणावर प्राणघातक हल्ला ; जामिनावर सुटताच डोक्यात लोखंडी वस्तूने केली मारहाण

तरुणावर प्राणघातक हल्ला ; जामिनावर सुटताच डोक्यात लोखंडी वस्तूने केली मारहाण

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add