• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या ; दोन गुन्हे उघडकीस

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 21, 2025
in गुन्हे
0
दुचाकी चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्या ; दोन गुन्हे उघडकीस

जळगाव, (प्रतिनिधी) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जलद आणि प्रभावी कारवाई करत शहरातील दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेल्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीबाबत १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादी सिद्धार्थ दीपक शर्मा (वय २३, रा. बालाजी मंदिर जवळ, जळगाव) यांनी तक्रार दिली होती की, २९ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास त्यांच्या २५,००० रुपये किमतीच्या बजाज पल्सर दुचाकीची चोरी झाली होती. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. १७ फेब्रुवारी रोजी पहाटे १ वाजता आकाश सुरेश शिंदे (वय १९, रा. साईनगर, कुंसुबा, जळगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी दुसरा दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादी सायरस महेश बोंडे (वय २८, रा. किसनराव नगर, जळगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळच्या दरम्यान शिरसोली रोडवरील रॉयल टर्फ परिसरातून ३५,००० रुपये किमतीची होंडा ड्रीम युगा मोटारसायकल चोरीला गेली होती. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १९ फेब्रुवारी रोजी सुरज मुनेंद्र द्विवेदी (वय २२, रा. सेक्टर डी, एमआयडीसी, जळगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत झनके, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, प्रदीप चौधरी, योगेश बारी, पोकॉ सिद्धेश्वर डापकर, शशिकांत मराठे, नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे, रतन गीत, छगन तायडे, किरण पाटील, ललित नारखेडे, विशाल कोळी यांनी विशेष मेहनत घेतली.

 


 

Next Post
निवृत्तीनगरात घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास !

निवृत्तीनगरात घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास !

ताज्या बातम्या

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात
आरोग्य

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात

June 25, 2026
जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार
क्रिडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

June 25, 2026
१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
जळगाव जिल्हा

१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी

June 25, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 24, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव जिल्हा

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 24, 2026
कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव जिल्हा

कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

June 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group