जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने शनिवारी संत नरहरी महाराजांच्या ७३९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल रामचंद्र सोनार यांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संत नरहरी महाराज यांच्या कार्याची माहिती विठ्ठल सोनार यांनी दिली. यानंतर समाजबांधवांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवान सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर, सचिव अतुल भालेराव, सदस्य कैलास सोनार, विलास सोनार, संजय सोनवणे, दिपक सोनार, संजय वाघ, अनिल सोनार, मुकुंदा विसपुते, गजानन दुसाने, समाधान सोनार, सचिन दुसाने, राजेंद्र गजानन सोनार, धनराज रणधीर, भुषण रणधीर, चेतन सोनार, प्रशांत सोनार,भरत सोनार, राजू सोनार उपस्थित होते.