• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने लांबवले ; आठवडे बाजारात साधली संधी

जळगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 17, 2025
in गुन्हे
0
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने लांबवले ; आठवडे बाजारात साधली संधी

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद गावातील आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किंमत असलेले सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना शुक्रवारी दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. महिलेने नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

माधुरी प्रकाश वाणी (वय ६३, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या परिवारासोबत नशिराबाद येथे राहतात. दर शुक्रवारी गावात मोठा आठवडे बाजार भरतो, जिथे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करतात. नेहमीप्रमाणेच माधुरी वाणी या देखील बाजारासाठी गेल्या होत्या. बाजारात खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला.

ही घटना घडल्यानंतर महिलेला काही काळ आपल्या दागिन्याच्या चोरीची कल्पना आली नव्हती. मात्र काही वेळानंतर गळ्यातील मंगळसूत्र गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित शोध घेण्याचा प्रयत्न केला. बाजारातील काही लोकांना विचारले, परिसरात शोध घेतला, पण चोरट्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार, नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश वराडे करीत आहेत.

Next Post
चोपडा रस्त्यावर पावणे २ लाखाचा गांजा पकडला

चोपडा रस्त्यावर पावणे २ लाखाचा गांजा पकडला

ताज्या बातम्या

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!
खान्देश

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!

December 8, 2025
बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन
खान्देश

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

December 8, 2025
मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे
खान्देश

मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

December 7, 2025
जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

December 7, 2025
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!
क्रिडा

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!

December 6, 2025
‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा
खान्देश

‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा

December 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group