किरण चौधरी | (प्रतिनिधी) : खादगाव रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे चार संशयित मोटरसायकल चोरट्यांना रविवारी ताब्यात घेण्यात जामनेर पोलिसांना यश आले आहे. दरम्यान त्यांच्याकडून दोन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे.
पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या आदेशाने पोलीस पथक खादगाव रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना विना क्रमांकाच्या दोन मोटरसायकल घेऊन जात असलेल्या चार संशयितांना हटकले. वाहनांच्या कागदपत्रा बाबत विचारपूस केली असता, ते उडवा उडवीची उत्तरे देत होते. त्यावरून पोलिसांना खात्री झाली की या मोटरसायकली चोरी करून आणलेल्या आहेत.
यात संशयित सागर अमृत चौधरी (वय ३५ ), सागर शिवाजी चौधरी (वय २६), संजय युवराज पाटील (वय ४५), योगेश भाऊराव गावंडे (वय ३९) सर्व रा. खादगाव ता. जामनेर अशा चार जणांना जामनेर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पो.हे. कॉ जयेंद्र पगारे, पो.हे. कॉ दिपक जाधव, पो.हे. कॉ सुशील सत्रे, पो.हे.कॉ अनिल राठोड, पो.कॉ. सचिन महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
चारही संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर तपासात असे निष्पन्न झाले की, दोनही मोटरसायकल ह्या बिस्टान पोलीस स्टेशन जि. खरगोन मध्य प्रदेश व छैगाव माखन पोलीस स्टेशन जि. खंडवा मध्यप्रदेश येथून चोरी करून आणल्या होत्या. संशयितांना बिस्टान पोलीस स्टेशन जि. खरगोन मध्यप्रदेश यांच्याकडे तपासाकामी देण्यात आले आहे.