• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी येणाऱ्या तरुणांचा अपघात

अपघातात दुचाकीवरील तरुण ठार, एक जखमी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 11, 2025
in जळगाव जिल्हा
0
बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी येणाऱ्या तरुणांचा अपघात

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरातील रेमंड चौफुली जवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण हा गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान इयत्ता बारावीच्या मंगळवारपासून परीक्षा असून त्याकरिता बैठक व्यवस्था पाहण्यासाठी दोघे तरुण जळगावात येत होते, अशी माहिती मिळाली. घटनेप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहित संजय मोरे (वय २०, रा.उमाळा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, बहिण यांच्यासह राहत होता. फार्मसीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. दरम्यान उमाळा गावातील गौरव अशोक पाटील (वय १८) याची मंगळवारपासून बारावीची परीक्षा असल्यामुळे जळगावात बैठक व्यवस्था पाहण्यासाठी गौरव सोबत मोहित मोरे हा जळगाव येत होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर जोरात पडले. त्यात दोघं गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास मोहित मोरे याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पुढील कार्यवाहीसाठी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अपघाताची मालिका जळगाव शहरात दिसून येत आहे.

Next Post
समस्यांना उत्तर शोधणाऱ्या युवकांची राष्ट्राला गरज.. – डॉ.जयेंद्र लेकुरवाळे

समस्यांना उत्तर शोधणाऱ्या युवकांची राष्ट्राला गरज.. - डॉ.जयेंद्र लेकुरवाळे

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add