• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाबाई महोत्सवात रंगला मराठी ‘संस्कृतीचा फॅशन-शो’

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 26, 2025
in मनोरंजन
0
बहिणाबाई महोत्सवात रंगला मराठी ‘संस्कृतीचा फॅशन-शो’

जळगाव, (प्रतिनिधी) : भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात शनिवारी सायंकाळी मराठी संस्कृती जपणारा महिलांचा फॅशन शो पार पडला. यात मराठमोळ्या पोषाखात तरुणींनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

सागर पार्क मैदानावर सुरू असलेल्या पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी जळगावकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली. शनिवारची सुट्टी असल्याने अनेकांनी सायंकाळी सागर पार्क मैदानावर येत बचत गटांच्या स्टॉलला भेटी दिल्या. यावेळी महोत्सवात सुक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने उद्योगांना चालना देण्यासाठी स्टाॅल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2025/01/Untitled-44_720p_1.mp4

महोत्सवात मराठी संस्कृतीच्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुंबई, सुरत, पुणे जळगाव येथील २५ मॉडेल्सनी सहभाग घेतला. या शोमध्ये लग्नासाठी च्या मराठी, मारवडी, गुजराती या प्रकारात पेहराव सादर केले. विनामूल्य असलेल्या या शोमध्ये सहभागी स्पर्धक व विजेत्यांना पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उद्योगपती रजनीकांत कोठारी, नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, तहसीलदार शीतल राजपूत, डॉ.पी.आर. चौधरी, जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र मोरखेडे, बाळासाहेब सुर्यवंशी, रवींद्र लढ्ढा, अपर्णा भट, विनोद ढगे, सचिन महाजन, सागर पगारीया, मोहित पाटील, विक्रांत चौधरी, रितेश लिमडा, अक्षय सोनवणे, मंगेश पाटील, दिपक जोशी, साजीद पठाण आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. परेश दोशी व डॉ. प्रीती दोशी यांना तर औद्योगिक क्षेत्रातील विशेष योगदानासाठी पीतांबरी उद्योग समूह, सामाजिक क्षेत्रात समर्पण प्रतिष्ठान अमरावती, भातृ मंडळ पुणे यांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

आज ‘लावणी महाराष्ट्राची’ व ‘भारत गौरव पर्व’ हे कार्यक्रम रविवारी सायंकाळी शाहीर मीरा दळवी व सहकारी यांचा लावणी महाराष्ट्राची तसेच प्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे यांचा भारत गौरव पर्व हे कार्यक्रम होतील असे आयोजकांनी कळविले आहे.

Next Post
तारेवरून पतंग काढताना विजेचा धक्का ; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू !

तारेवरून पतंग काढताना विजेचा धक्का ; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू !

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group