• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने कार जाळून खाक !

जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने कार जाळून खाक !

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मोहाडी रोड व लांडोरखोरी उद्यानाजवळ शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान एका चारचाकी गाडीला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

जळगाव शहरातील आदर्श नगर परिसरात गुरूमीत सिंग हे कुटुंबियांसह राहतात. नेहमीप्रमाणे गुरूमीत सिंग हे कार क्रमांक (एमएच १९ बीयू ३००१) ने महाबळ परिसरात लांडोरखोरी येथे आलेले होते. त्यावेळी त्यांनी मोहाडी रस्त्यावर कार उभी केली होती. दरम्यान कारमध्ये शार्टसर्कीट झाल्याने सुरूवातीला धुर निघाला आणि त्यानंतर क्षणात कारने पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी परिस्थिती पाहताच तातडीने मनपाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली.

अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टाळला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे त्यांना यश आले नाही. मात्र, अग्निशमन दलाच्या वेगवान आणि प्रभावी कारवाईमुळे आग आणखी पसरली नाही. आगीची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून ती शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे.

Next Post
भीषण अपघात ; डंपरने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत एक ठार, तीन जखमी

भीषण अपघात ; डंपरने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत एक ठार, तीन जखमी

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add