• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कंटेनरने वृद्ध दुचाकीस्वाराला दिली धडक ; धडकेत वृद्धाचा मृत्यू

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 23, 2025
in जळगाव जिल्हा
0
कंटेनरने वृद्ध दुचाकीस्वाराला दिली धडक ; धडकेत वृद्धाचा मृत्यू

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर ते ब-हाणपूर रोडवरील नायगाव फाट्याजवळ एका कंटेनरने वृद्ध दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना घडल्यावर कंटेनर चालक फरार झाला.

रघुनाथ नाना पाटील (वय ७० वर्षे, रा. पिंपरी पंचम ता. मुक्ताईनगर) असे मयत वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील भगवान तुकाराम चौधरी (वय ५२ वर्ष) यांनी मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.

मयत रघुनाथ नाना पाटील हे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक (एम एच १९ बी. एफ.६८३) या वाहनाने जात होते. सदर वाहनाला कंटेनर क्रमांक (एचआर ३८ एडी ५१०९) या वाहनाने भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात रघुनाथ नाना पाटील हे ठार झाले. घटना घडल्यावर कंटेनर चालक कंटेनर सोडून फरार झाला. दरम्यान या संदर्भात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: accident
Next Post
भुसावळातील चार उपद्रवींना केले हद्दपार ; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

भुसावळातील चार उपद्रवींना केले हद्दपार ; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add