• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

१५ व्या खान्देशस्तरीय साहित्य संमेलनात वाजला तावडी बोलीचा डंका

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
१५ व्या खान्देशस्तरीय साहित्य संमेलनात वाजला तावडी बोलीचा डंका

किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : येथील जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने आयोजित १५ वे खान्देशस्तरीय साहित्य संमेलनामध्ये तावडी बोली भाषेच्या सादरीकरणाने रंगत वाढवली. जामनेर येथील स्व.हिरालाल अमृतला बोहरा साहित्य नगरी येथे संपन्न झालेल्या विविध सत्रांमधून साहित्य विषयक गंभीर चर्चा आणि मांडणी करण्यात आली.

साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने पंधरावे खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.त्रिशीला साळवे तायडे या होत्या तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे हे होते. यावेळी व्यासपीठावर तावडी बोलीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कौतिक कोळी, अनिलकुमार हिरालाल बोहरा व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष त्रिशीला साळवे यांनी स्रीवादी लेखिकांनी वस्तुनिष्ठ लेखनातून स्वतंत्र स्थान निर्माण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे यांनी आपल्या लेखनाची भूमिका स्पष्ट केली. सोबतच बहिणाबाई चौधरी यांची बोली ही तावडी बोली आहे असे प्रतिपादन केले. हाच धागा पकडून डॉ. अशोक कौतिक कोळी यांनी सुद्धा तावडी बोलीतील लिखाणाला प्रोत्साहन देण्यासंदर्भात लेखकांनी जास्तीत जास्त तावडी बोलत लेखन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागताध्यक्ष दिलीप खोडपे यांनी साहित्यिकांच्या कलाकृतींमुळे मनाची उभारी वाढते. त्यामुळे साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती करावी असे प्रतिपादन केले. तर अनिल कुमार बोहरा यांनी साहित्य विषयक उपक्रमांना नेहमीच सहकार्य करत राहील अशी ग्वाही दिली.

उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी तर प्रास्ताविक विनोद जाधव यांनी केले. दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. विश्वास पाडोळसे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन संपन्न झाले. या सत्रात राहुल निकम, प्रा.सुरेश पाटील, डॉ.संगीता गावंडे, विजय सैतवाल यांनी पूर्व खान्देशातील मराठी बोलीतून दर्जेदार कथा सादर करून ग्रामीण जीवनाचे व शेतकरी जीवनाचे दर्शन घडवले. तावडे बोलीतून संपन्न झालेले कथाकथन सत्र खूपच रंजकदार ठरले.

यावेळी विजयी कथा कविता स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले सोबतच काही कलाकृतींचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सत्कार घडवून आणला त्यामध्ये पं. ना. पाटील, संदीप रघुनाथ पाचंगे, मोहन जगन्नाथ सारस्वत, संदीप जगन्नाथ पाटील, रमेश कांतीलाल पाटील यांचा समावेश होता.

बुलढाणा येथील प्रख्यात कवी सुभाषिकेनोळकर यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलन संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी डॉ.अशोक कोळी हे उपस्थित होते. यावेळी बोलीभाषेतील तावडी अहिराणी व वैधर्भी बोलीतील जवळपास ४० कवींनी कविता वाचन करून ग्रामीण जीवन आई शेतीमाते व कृषी जीवन यावर आपल्या कविता सादर केल्या.

जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने हे एक दिवशीय खानदेश तरी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले सुरुवातीलाच सकाळी सारसतांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जामनेर शहरातून ग्रंथ दिंडीला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला संमेलनाचा समारोप माजी सभापती बाबुराव डोंगरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला विविध क्षेत्रांना जामनेर परिसराने जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात रसिक व साहित्यिकांनी उपस्थिती दिली.

संमेलन यशस्वीतेसाठी जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डी.डी.पाटील, सहसचिव जितेंद्र रामकृष्ण गोरे, सचिव गोरख सूर्यवंशी, विनोद जाधव, शंकर भामरे, श्रीकांत पाटील, विजय सैतवाल, सैय्यद रशीद, विजय सूर्यवंशी, कृष्णा माळी, अश्विन रोकडे यांनी सहकार्य केले व परिश्रम घेतले.


 

Next Post
मेहरुण येथे साईबाबा मंदिर वर्धापनदिनानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन

मेहरुण येथे साईबाबा मंदिर वर्धापनदिनानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

October 3, 2026
भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम
जळगाव जिल्हा

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम

October 3, 2026
एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट
खान्देश

मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट

October 3, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
खान्देश

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 3, 2026
रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add