• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या हस्ते कविरत्न पुरस्काराचे वितरण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 16, 2021
in मनोरंजन
0
कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या हस्ते कविरत्न पुरस्काराचे वितरण

जळगाव | खानदेश प्रभात वृत्तसेवा | अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघप्रणीत बहिणाई ब्रिगेड संघातर्फे शुक्रवारी महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते समाजातील दहा कवींना कविरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम शहरातील बहिणाबाई चौधरी उद्यानात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बहिणाबाई चौधरींच्या स्मृतींना उजाळा म्हणून काही कवींनी त्यांची गाणी गायिली. तसेच महापौर जयश्री महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि जळगाव यांच्यातील नाते उपस्थितांसमोर विशद केले. त्यानंतर महापौर यांच्या हस्ते तुषार वाघुळदे, के. के. भोळे, ए.के.नारखेडे, प्रा.डॉ.संध्या महाजन, सुनीता येवले, प्रा.डॉ.प्रकाश महाजन, मनीषा चौधरी, सविता भोळे, ज्योती राणे -पाटील, शीतल पाटील याांना कविरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

याप्रसंगी बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा व माजी महापौर श्रीमती आशा कोल्हे, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंडू भोळे, प्रदेश उपाध्यक्षा हर्षा बोरोले, जिल्हाध्यक्षा सुनीता येवले, महानगराध्यक्षा श्रीमती साधना लोखंडे नगरसेविका मीनाक्षी पाटील, श्रीमती रजनी महाजन, श्रीमती अंजली चौधरी यांच्यासह कार्यकारिणीतील सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatकवयित्री बहिणाबाई चौधरीजळगाव
Next Post

अमळनेरात फडकणार शंभर फुटी स्तंभावर भव्य तिरंगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नर्मदेच्या पाण्याने स्वयंभू महादेव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक
जळगाव जिल्हा

नर्मदेच्या पाण्याने स्वयंभू महादेव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक

June 6, 2023
शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद
कृषी

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद

June 4, 2023
वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
जळगाव जिल्हा

वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

June 4, 2023
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास
जळगाव जिल्हा

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास

June 4, 2023
शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज
कृषी

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

June 4, 2023
अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
जळगाव जिल्हा

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर

June 2, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.