• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाणंद रस्ते व पाणी पुरवठा योजनां प्राधान्य द्या, अन्यथा गय नाही.. – आ.किशोर पाटील

पाचोरा तालुका आढावा बैठकीत आमदारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
पाणंद रस्ते व पाणी पुरवठा योजनां प्राधान्य द्या, अन्यथा गय नाही.. – आ.किशोर पाटील

विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले शेत पाणंद रस्ते, पाणी पुरवठा योजना या केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या अनास्थेमुळे प्रलंबीत राहत असून हे विषय प्राधान्याने पूर्ण करा. मार्च २०२५ अखेर पर्यंत विविध कामांना गती न दिल्यास अधिकाऱ्यांची आपण गय करणार नाही असा सज्जड दम आमदार किशोर पाटील यांनी आढावा बैठकीत दिला. याबैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पंचायत समिती पाणीपुरवठा कृषी, वीज मंडळ, पोलिस प्रशासन आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

प्रसंगी आगामी शिवजयंतीच्या आधी मतदार संघात उभारलेल्या शिवस्मारकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे बसविण्याची परवानगी मागणे कामी सर्व ग्रामपंचायतींनी आगामी २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव करण्याच्या सूचना सर्व सरपंच व ग्रामसेवकांना द्याव्यात, अशी सूचना आ.किशोर पाटील यांनी केली असून पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार बनसोडे, उपविभागीय आरोग्य अधिकारी डॉ.सतिष टाक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दीपक पाटील, मुख्याधिकारी मंगेश देवरे, लघु पाटबंधारे विभागाचे चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, पोलिस निरीक्षक अशोक पवार, पिंपळगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, एमएसईबीचे कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे, गटविकास अधिकारी समाधान पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षद मुलाणी, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एम.व्ही. तोतावार, सहाय्यक निबंधक पाटील, आगार प्रमुख पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी लांडे, महिला बाल विकास विभागाच्या जिजा राठोड यांचेसह पाचोरा तालुक्यातील शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. सोबत जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, माजी जि. प. सदस्य मधुकर काटे, बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, सुमित पाटील, समाधान पाटील,स्विय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार आदींची उपस्थिती होती.

यावेळी ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती, पर्यटन विकासाअंतर्गत बहुळा धरण, काकणबर्डी, पिंपळगाव हरेश्र्वर येथील हरिहरेश्वर यांचे मंदिर, पिंपळगाव (हरे) येथे नवीन बस स्थानक निर्मिती, गोठा शेड, ग्रामीण भागातील पुल, विजेचे सब स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण भागातील बस फेऱ्या, कृषी विभागाची जमीन, शहरातील मानसिंगका येथील खुला भूखंड व घरे, शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, शहरातील अतिक्रमित घरे आदी विषयांबाबत आ.किशोर पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

आपली बांधिलकी जनतेशी असून शासन दरबारी अधिकारी वर्गास काही तांत्रिक अडचणी असल्यास त्यांनी निसंकोचपणे सांगाव्यात मात्र कायदेशीर बाजूंचा बाऊ करत जनतेला वेठीस धरू नये अशी सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

आजच्या आढावा बैठकीला वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता श्री थानवी हे गैरहजर असल्याने त्यांच्याशी संबंधित विषयांची नेमकी उत्तरे त्यांचे ऐवजी आलेल्या अधिकाऱ्यांना देता न आल्याने आ.पाटील यांनी नाराजी व्यक्त केली यापुढे बैठकीला येताना परिपूर्ण माहितीसह उपस्थित रहावे अशी सूचना देखील केली.


Next Post
तांबापुरात जबरी घरफोडी ; चोरटयांनी लांबविला ९ लाखांचा मुद्देमाल

तांबापुरात जबरी घरफोडी ; चोरटयांनी लांबविला ९ लाखांचा मुद्देमाल

ताज्या बातम्या

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!
खान्देश

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!

October 25, 2025
जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले

October 25, 2025
पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!
खान्देश

पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

October 25, 2025
बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड
खान्देश

बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

October 24, 2025
“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध
खान्देश

“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

October 23, 2025
आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत
खान्देश

आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

October 23, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group