• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पुष्पा-2 चे निर्माते व अभिनेता अल्लू अर्जुन कडून पिडीत कुटुंबास दोन कोटींची मदत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 26, 2024
in मनोरंजन
0
पुष्पा-2 चे निर्माते व अभिनेता अल्लू अर्जुन कडून पिडीत कुटुंबास दोन कोटींची मदत

हैदराबाद, (वृत्तसंस्था) :  ‘पुष्पा-२’च्या विशेष स्क्रीनिंगवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. यानंतर अल्लू अर्जुनसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी चेंगराचेंगरीतील पीडित महिलेच्या कुटुंबाला दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे बुधवारी जाहीर केले.

पीडित महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून अल्लू अर्जुनने १ कोटी आणि दिग्दर्शक सुकुमार व मैत्रेयी प्रोडक्शन हाऊसने ५०-५० लाख रुपये दिले आहेत. तेलंगणा राज्य चित्रपट विकास प्राधिकरणचे अध्यक्ष दिल राजू हे आर्थिक मदतीचा धनादेश पीडित कुटुंबाला देतील, अशी माहिती अल्लू अर्जुनचे वडील व प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद यांनी दिली. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमी मुलाच्या प्रकृतीबाबत माहिती घेतल्यानंतर त्यांनी  प्रसार माध्यमांना माहिती दिली.

अल्लू अरविंद, दिल राजू व अन्य लोकांनी रुग्णालयात जाऊन मुलाच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवरून काढण्यात आल्याचे अरविंद यांनी सांगितले. तर तेलंगणा सरकार व अभिनेत्याकडून आपल्याला मदत मिळत असल्याचे पीडित महिलेच्या पतीने म्हटले. दरम्यान, सरकार व चित्रपटसृष्टीतील संबंधांना चालना देण्यासाठी चित्रपटातील दिग्गजांचे एक शिष्टमंडळ आज गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेणार असल्याची माहिती दिल राजू यांनी दिली.

‘पुष्पा २’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला ४ डिसेंबरच्या रात्री उपस्थित असलेल्या अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. यावेळी धावपळ उडाल्याने ३५ वर्षीय रेवती नामक महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा ८ वर्षीय श्री तेजा नामक मुलगा जखमी झाला होता. पीडित महिलेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून हैदराबाद पोलिसांनी अभिनेत्यासह त्याची सुरक्षा टीम व चित्रपटगृह व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर १३ डिसेंबर रोजी महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. पण तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याच दिवशी अभिनेत्याला चार आठवड्यांचा जामीन मंजूर केला होता.

Next Post
सतरंगी रे ने मैत्र महोत्सवात भरले नृत्याचे रंग

सतरंगी रे ने मैत्र महोत्सवात भरले नृत्याचे रंग

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add