• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक ठार ! ; एरंडोल येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 23, 2024
in जळगाव जिल्हा
0
भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक ठार ! ; एरंडोल येथील घटना

पुतणीच्या विवाहाआधीच काकाचे अपघाती निधन, नागरिकांकडून संतप्त भावना

एरंडोल, (प्रतिनिधी) : शहरातील महामार्गावरील अमळनेर नाक्याजवळ भरधाव टँकरने रविवारी रात्री १० वाजेच्या सुमाराला दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन जण ठार झाले आहे. संतप्त नागरिकांनी यावेळेला आपल्या भावना मांडून महामार्ग प्राधिकरणाला जबाबदार धरले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

राजू भिला भोई (४६, रा. एरंडोल) आणि दीपक रामकृष्ण मोरे (वय ३४, रा. शिरसोली ता. जळगाव) अशी मृतांची नावे असून ते साडूभाऊ होते. राजू भोई यांच्या पुतणीला रविवारी हळद लागली. सोमवारी तिचा विवाह होणार आहे. दरम्यान, रविवारी रात्री राजू भोई व दीपक मोरे घराकडे जात असताना महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. टँकरने (क्र.एम.एच १९/बी.पी. २००३) धडक दिल्यावर राजू भोई हे जागीच ठार झाले तर दीपक हे जखमी झाले. त्यांना लागलीच एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. टँकर पारोळा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

घटनेची एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान लग्न घरामध्ये शोककळा पसरल्यामुळे एरंडोल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. न्हाईचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. याआधीही याच ठिकाणी महामार्ग क्रॉसिंगवर अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत.

Tags: accident
Next Post
दुचाकी चोरट्यास अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

दुचाकी चोरट्यास अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add