• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 12, 2024
in जळगाव जिल्हा
0
विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या ; पाचोरा तालुक्यातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील मोंढाळे येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर त्याचा गुरुवारी दि. १२ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

युवराज दशरथ जमादार (वय ४९, रा. मोंढाळे ता. पाचोरा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात आई, पत्नी, २ मुली, १ मुलगा यांच्यासह राहत होते. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. मागील वर्षी त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह झाला आहे. दरम्यान, त्यांच्यावर सोसायटी व बँकेचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. सातत्याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेत ते राहत असल्याने त्यातूनच युवराज जमादार यांनी शेतातच सोमवारी दि. ९ डिसेंबर रोजी रात्री ९. ३० वाजता विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आजूबाजूच्या ग्रामस्थांनी युवराज यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे तीन दिवस अतिदक्षता विभागात त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर गुरुवारी दि. १२ रोजी दुपारी त्यांची ४.३० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे मोंढाळा गावात शोककळा पसरली असून त्यांच्या परिवाराला शासनाकडून मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Next Post
संजीवन दिनी मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न

संजीवन दिनी मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add