• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अट्टल चोरट्यास अटक ; मुक्ताईनगर पोलीसांची कामगिरी

अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 12, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अट्टल चोरट्यास अटक ; मुक्ताईनगर पोलीसांची कामगिरी

मुक्ताईगनर, (प्रतिनिधी) : शहरातील गोदावरी नगर परिसरातील बंद घरात घुसून चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या दोघा अट्टल चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. अनेक गुन्ह्यात या चोरट्याचा सहभाग असल्याची माहिती मिळत असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रामा अण्णा पवार (वय २७, रा. भोकरदन, जि. जालना) असे या चोरट्याचे नाव आहे. तो गेल्या काही वर्षांपासून अनेक गुन्ह्यात फरार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ११ डिसेंबरच्या रात्री २ वाजेच्या सुमारास आरोपी राम अण्णा पवार व त्याचा एक साथीदार अशा दोघांनी गोदावरी नगर परिसरात राहणाऱ्या आरोग्य कर्मचारी जयश्री थेटे यांच्या घरात कडीकोंडा तोडून प्रवेश केला होता. या परिसरात इतर ठिकाणी देखील चोरी करण्याचा त्यांचा मानस होता. अशातच बोदवड पोलिस स्टेशनला नेमणुकीला असलेले अतुल बोदडे यांना या घरात चोर लपून बसल्याची माहिती मिळाली.

त्यांनी तत्काळ स्थानिक मुक्ताईनगर पोलिस सचिन जाधव, सुरेश मेढे, गोविंदा सुरवाडे यांना फोन करून बोलावून घेतले व सापळा रचत रामा अण्णा पवार यास ताब्यात घेतले. यादरम्यान एक संशयित आरोपी मात्र फरार झाला. दरम्यान, बंद घराच्या मालकीण जयश्री थिटे या पुणे येथे गेलेल्या असल्याने अद्याप पावेंतो गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

पोलिस कर्मचारी बोदडे यांचे कौतुक..
अतुल बोदडे हे बोदवड पोलिस स्टेशनला नेमणुकीला आहेत. मंगळवारी त्यांची सुटी असल्याने ते घरी होते. रात्रीच्या सुमारास थेटे यांच्या घरात कोणीतरी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी इतर स्थानिक कर्मचाऱ्यांना फोन केला असता पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना घटनास्थळाकडे रवाना केले. याप्रसंगी आरोपींनी दगड आणि लोखंडी पाइपने बोदडे यांना मारण्याचा प्रयत्न केला, मात्र भीती न बाळगता बोदडे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने चोरट्याच्या मुसक्या आवळल्या दरम्यान बोदडे यांचे कौतुक होत आहे.


 

Tags: CrimemuktainagarPolice
Next Post
महसूल कामांची मिळेल नियमित अपडेट आणि कामाला गती.. – जिल्हाधिकारी

महसूल कामांची मिळेल नियमित अपडेट आणि कामाला गती.. - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add