• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव महानगरपालिकेत लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात अटक !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 9, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगाव महानगरपालिकेत लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात अटक !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : बांधकाम परवानगी व घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे तीन प्रकरणापैकी दोन प्रकरणांसाठी ३० हजारांची मागणी करत पहिल्या प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या जळगाव महापालिकेतील नगररचना विभागाचे रचना सहाय्यक अधिकारी यांना रंलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मनोज समाधान वन्नेरे (वय ३४, जळगाव) असे अटक केलेल्या नगररचना सहाय्यक अधिकाऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदार यांनी बांधकाम परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचे प्रकरण जळगाव महानगरपालिकेत मंजुरीसाठी टाकले होते. त्यांनी एकूण महापालिकेत ३ प्रकरणे दाखल केलेले आहेत, पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांनी सुरुवातीला पहिल्या प्रकरणात २१ हजारांची मागणी केली, त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपये देण्याचे ठरले.

तसेच दुसऱ्या प्रकरणात १५ हजार रुपये महापालिका आयुक्त आणि सहाय्यक संचालक यांना देण्यासाठी मागितले. असे एकूण त्यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीनुसार पथकाने सोमवारी दि. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. दरम्यान १५ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांना रंगेहात पकडण्यातआले.

या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोउनि सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर पाटील, राकेश दुसाने यांनी कारवाई केली आहे.

Next Post
चिमुकलीवर १७ वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार !

चिमुकलीवर १७ वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार !

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न
शैक्षणिक

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 29, 2026
जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस दलातर्फे पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

July 28, 2026
न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 28, 2026
परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मनोरंजन

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
गुन्हे

चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

July 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add