• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या दरबारात अमळनेरच्या आमदाराचे साकडे

साहेब खान्देशातील शेतकरी दुष्काळाने होरपळतोय.. - आ.अनिल पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 16, 2021
in राजकीय
0
मुख्यमंत्र्यांच्या दरबारात अमळनेरच्या आमदाराचे साकडे

गजानन पाटील | अमळनेर | प्रतिनिधी- अमळनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण खान्देशात यंदा वार्षिक सरासरीच्या 25% पेक्षा कमी प्रजन्यमान झाले असल्याने पिकांची आशा जवळपास संपली आहे, अश्या परिस्थितीत शेतकरी राजावर संकट आलं आहे.
दरम्यान अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात, खान्देश दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.

मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अमळनेर मतदारसंघच नव्हे तर संपुर्ण खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळामुळे पीडित झालेल्या शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडल्या.

बळीराजा खूपच खचलाय दुबार आणि तिबार पेरणीचे सारेच प्रयत्न फोल ठरले असून पिकांची आशा तर जवळपास संपलीच आहे, आता पुढे काय? हा एकच प्रश्न प्रत्येकासमोर असून अश्या कठीण परिस्थितीत बळीराजास हेक्टरी 25,000/- रुपये सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करा, शेतीपंपाचे चालू वर्षाचे विज बिल माफ करा, गावोगावी गुरांसाठी चारा छावण्या सुरू करा, याव्यतिरिक्त जे जे करण्याजोगे असेल ते ते करा पण बळीराजाला धीर द्या अश्या मागण्या अत्यंत भावनाशील स्वरात आमदारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केल्या. दरम्यान मागण्यांचे लेखी निवेदन देखील आमदार अनिल पाटील दिले. याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री ना.दिलीपराव वळसे-पाटील देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्यांचे संपुर्ण म्हणणे ऐकून घेत, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारे असून यात खान्देशचा विशेष प्राधान्याने विचार होईल आणि पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आमदार पाटील यांना दिली.

Next Post
कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या हस्ते कविरत्न पुरस्काराचे वितरण

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या हस्ते कविरत्न पुरस्काराचे वितरण

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group