• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

धरणगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 30, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

जळगाव, (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दिपक शिवाजी चौधरी (वय ४२ रा. झुरखेडा ता. धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. झुरखेडा गावात दिपक चौधरी हे शेतकरी आई, पत्नी व दोन मुलं यांच्या सोबत वास्तव्याला होते. शेती करून ते उदरनिर्वाह करत होते. गुरूवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांची पत्नी छायाबाई ह्या शेतात कामासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी दिपक चौधरी हे घरी एकटेच होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

शेती करण्यासाठी त्यांनी खासगी व सोसायटीकडून ५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यात सततची नापीकीमुळे ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती त्यांच्या गावातील नातेवाईकांनी दिली. दुपारी त्यांची पत्नी घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

Next Post
विद्यार्थ्याच्या मृत्यूपश्चात पालकांना विम्याच्या रकमेचा धनादेश प्रदान

विद्यार्थ्याच्या मृत्यूपश्चात पालकांना विम्याच्या रकमेचा धनादेश प्रदान

ताज्या बातम्या

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ
आरोग्य

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

July 3, 2026
संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
खान्देश

संत सखाराम महाराज वाडी संस्थान आग दुर्घटना: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

July 3, 2026
एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली
गुन्हे

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली

July 3, 2026
कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी
जळगाव जिल्हा

कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी

July 3, 2026
कापूस पिकात पाणी बचतीचे धडे; सेवा फाउंडेशनच्या ४८ गावांतील महिलांना प्रशिक्षण
कृषी

कापूस पिकात पाणी बचतीचे धडे; सेवा फाउंडेशनच्या ४८ गावांतील महिलांना प्रशिक्षण

July 3, 2026
चोपड्यात आंतरजिल्हा टोळी जेरबंद; गावठी कट्टा, मॅगझिनसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!
गुन्हे

चोपड्यात आंतरजिल्हा टोळी जेरबंद; गावठी कट्टा, मॅगझिनसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

July 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group